esakal | दिलासादायक ! सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनशेच्यावर कोरोनामुक्त 
sakal

बोलून बातमी शोधा

More Than 300 Corona Patient Cure In Sindhudurg District

कणकवली तालुक्‍यातील नांदगांव येथील 5, तळेरे येथील 2, फोंडा येथील 1, कर्ली येथील 3, खारेपाटण येथील 2 अशाप्रकारे रुग्ण मिळाले आहेत. तर सावंतवाडी तालुक्‍यातील बांदा येथील 2 रुग्णाचा समावेश आहे.

दिलासादायक ! सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनशेच्यावर कोरोनामुक्त 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ओरोस ( सिंधुदुर्ग ) -  जिल्ह्यात आणखी आठ व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. परिणामी जिल्ह्याची कोरोनामुक्त संख्या 300 पार होत 305 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात सध्या 109 सक्रिय रुग्ण राहिले असून ते उपचाराखाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली. 

जिल्ह्यात काल (ता. 3) रात्री पाच व्यक्ती कोरोना बाधित सापडल्या होत्या. त्यामुळे कोरोना बाधित संख्या 420 वर पोहोचली होती. या पंधरा रुग्नांमध्ये कणकवली तालुक्‍यातील 13, सावंतवाडी तालुक्‍यातील 2 अशाप्रकारे रुग्नांचा समावेश आहे.

कणकवली तालुक्‍यातील नांदगांव येथील 5, तळेरे येथील 2, फोंडा येथील 1, कर्ली येथील 3, खारेपाटण येथील 2 अशाप्रकारे रुग्ण मिळाले आहेत. तर सावंतवाडी तालुक्‍यातील बांदा येथील 2 रुग्णाचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्हा कोरोना तपासणी केंद्राला नव्याने 57 कोरोना तपासणी नमूने प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कोरोना तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची संख्या 6 हजार 678 झाली आहे. यातील 6 हजार 642 नमूने प्राप्त झाले आहेत. अजुन 36 नमूने अहवाल प्रलंबित आहेत.

प्राप्त अहवालातील 6 हजार 222 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 420 अहवाल बाधित आले आहेत. बाधितपैकी 305 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. सहा व्यक्तिचे दुर्दैवी निधन झाले आहे. परिणामी जिल्ह्यात 109 रुग्ण सक्रिय राहिले आहेत. 

जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात सध्या 140 रुग्ण उपचार घेत आहेत. यातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असलेल्या जिल्हा रुग्णालयात 54 कोरोना बाधित आणि 30 कोरोना संशयित उपचार घेत आहेत.

डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 25 कोरोना बाधित आणि 1 संशयित उपचार घेत आहेत. तर कोविड केअर सेंटरमध्ये 21 कोरोना बाधित उपचार घेत आहेत. तर 5 कोरोना बाधित होम क्वारंटाईन आहेत. 3 रुग्ण जिल्ह्या बाहेरिल आहेत. एका व्यक्तिची आयसोलेशन व्यवस्था सुरु आहे. आज जिल्ह्याच्या आरोग्य पथका कडून जिल्ह्यातील 4 हजार 585 व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. यातील कोणालाही कोरोनाचे लक्षण आढळले नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 1 हजार 202 कमी झाल्याने येथे 19 हजार 752 व्यक्ती दाखल राहील्या आहेत. यातील शासकीय संस्थात्मक क्वारंटाईनमधील 1 व्यक्ति वाढल्याने येथील संख्या 39 झाली आहे. गाव पातळीवरिल संस्थात्मक क्वारंटाइन मधील 1 हजार 377 व्यक्ती कमी झाल्याने येथील संख्या 15 हजार 922 झाली आहे.

नागरी क्षेत्रातील संस्थात्मक क्वारंटाइन मधील 104 व्यक्ति वाढल्या असून येथील संख्या 3 हजार 721 झाली आहे. तर जिल्ह्यात नव्याने 2 हजार 563 व्यक्ती दाखल झाल्याने 2 मेपासून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तिची संख्या 1 लाख 72 हजार 694 झाली आहे. जिल्ह्यात 1 कंटेन्मेंट झोन वाढला असून 45 कंटेन्मेंट झोन सक्रिय आहेत. 

देवगड येथे नवीन कंटेन्मेंट झोन 

देवगड पवनचक्की येथील दिलीप बाबूराव मेस्त्री यांच्या घरापुरताचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. सावंतवाडी तालुक्‍यातील बांदा शेटकरवाडी हद्दीमध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. या कंटेन्मेंट झोनमध्ये 16 ऑगस्टपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहे. 
 

 
 

loading image
go to top