जांभुळपाडा कळंब मार्गावरील मोरी खचली

अमित गवळे
सोमवार, 16 जुलै 2018

पाली - सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा ते कळंब मार्गावर तांबडमाळ नदी पुल आहे. हा पुल मोडकळीस आला असुन पुलालगत असलेली मोरी खचली आहे. त्यामूळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

पाली - सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा ते कळंब मार्गावर तांबडमाळ नदी पुल आहे. हा पुल मोडकळीस आला असुन पुलालगत असलेली मोरी खचली आहे. त्यामूळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे.त्यामूळे सातत्याने वाहतुकीचा खोळंबा होत असुन पादचार्यांना देखिल मार्ग काढतांना अडथळा होतो. या मार्गावरील पुल जुना झाला असुन मोडकळीस आला आहे. पुलाला आधार देणारे मुख्य खांब पोखरले आहेत. त्यातील सळया बाहेर पडल्या आहेत. या पुलावर दोन्ही बाजूला संरक्षण कठडेच नाहीत. वाहने गेल्यास पुलाला हादरे बसत असल्याने वाहनचालक व नागरीक घाबरत आहेत. अनेक दिवसापासून पुलालगतची मोरी खचली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यात या पुलावर मोठा अपघात होउन जिवीतहाणी होण्याची भिती वाढली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलावर संरक्षण कठडे बसविण्यात यावे तसेच पुलाची व मोरीची तत्काळ दुरुस्ती व मजबुतीकरण करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कोकण संघटक रमेश पवार व वामन वारे यांनी केली आहे. अनेकदा या पुलाच्या दुरुस्तीची मागणी करुनदेखील प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष कले जात असल्याचे वारे यांनी सांगितले.

Web Title: Mori dumps on Jambulpada Kalamb road