पेन्शन धारकांच्या मागण्यासाठी मुंबईत धरणे आंदोलन 

लक्ष्मण डुबे 
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

रसायनी (रायगड) - रायगड औद्योगिक पेन्शनर व वेलफेअर आसोशिएशन व इतर जिल्ह्यातील आसोशिएशन यांच्या वतीने बुधवार (ता 25) रोजी ईपीएस पेन्शन धारकांच्या विविध मागण्यांबाबत मुंबई येथील आझद मैदानावर एक दिवसाचे धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

ईपीएफओच्या ऑर्डर प्रमाणे पुर्ण पगारावर पेन्शन मिळावी, प्रत्येक पेन्शन धारकाला कमीत कमी नऊ हजार पेन्शन व महागाई भत्ता मिळाला पाहिजे, आर ओ सी पेन्शन धारकाच्या फायद्याची आहे पुन्हा सुरू करावी, ईएसआयसी योजना प्रमाणे  मेडिकल सवलत मिळावी, विधवांना शंभर टक्के पेन्शन मिळावी, इतर  मागण्यासाठी धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

केंद्र सरकारकडे ईपीएस 95 पेन्शन धारकाच्या प्रलबिंत मागण्याचा नऊ वर्षापासुन पाठपुरावा सुरू आहे. कोशीयारी कमिटीच्या शिफारशी लागु केल्या जातील असे आश्वासन सरकाराने दिले होते, मात्र पाळले नाही. तर ईपीएस पेन्शन धारकांचे प्रश्न सोडविण्या बाबत शासन गंभीर नाही. चालढकलपणा करून सरकार धाराकांची दिशा भुल करीत असल्याचा आरोप रायगड औद्योगिक पेन्शनर व वेलफेयर आसोशिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव बामणे यांनी केला आहे. मागण्यांन बाबत राज्य सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी  धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. असे बामणे यांनी सांगितले. तर रायगड जिल्ह्यातील  ईपीएस पेन्शनर धारक मोठ्या संख्याने समील व्हावे असे आव्हान बामणे यांनी केले आहे. 

Web Title: movement in Mumbai for demand of pension holders