esakal | `झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, सर्व्हिस रस्ता झालाच पाहिजे...`

बोलून बातमी शोधा

Movement for the road In Nandgaon

नांदगाव सर्व्हिस रस्ता प्रश्नी आज अचानक नांदगांव पंचक्रोशीचे ठिय्या आंदोलन झाले. नांदगाव पंचक्रोशी ग्रामस्थांचा विजय असो, झालाच पाहीजे झालाच पाहीजे सर्व्हिस रस्ता झालाच पाहिजे, आधी सर्व्हिस रस्ता करा,मगच पुलाचे काम करा आदी घोषणांनी नांदगाव तिठा दणाणला. या प्रश्‍नावर एकत्रीत बैठक घेवून तोडगा काढण्याच्या प्रशासनाच्या लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

`झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, सर्व्हिस रस्ता झालाच पाहिजे...`
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदगाव (सिंधुदुर्ग) - नांदगाव सर्व्हिस रस्ता प्रश्नी आज अचानक नांदगांव पंचक्रोशीचे ठिय्या आंदोलन झाले. नांदगाव पंचक्रोशी ग्रामस्थांचा विजय असो, झालाच पाहीजे झालाच पाहीजे सर्व्हिस रस्ता झालाच पाहिजे, आधी सर्व्हिस रस्ता करा,मगच पुलाचे काम करा आदी घोषणांनी नांदगाव तिठा दणाणला. या प्रश्‍नावर एकत्रीत बैठक घेवून तोडगा काढण्याच्या प्रशासनाच्या लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

आंदोलनाची माहीती मिळताच आमदार नितेश राणे व कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट देवून आंदोलकांशी चर्चा केली. प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना या आंदोलना ठिकाणी पाचारण केले व झालेल्या चर्चेत यासंदर्भात 12 मार्चला सकाळी 11 वाजता प्रांत कार्यालयात संबधीत अधिकारी व ग्रामस्थांचे शिष्टमंडळ यांची एकत्र बैठक घेण्याचे मान्य केले.

सार्वजनिक बांधकामचे खारेपाटण येथील शाखा अभियंता डी.जी.कुमावत यांना लेखी पत्र आंदोलकांना द्यायला लावले. हे लेखी आश्‍वासन मिळाल्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित केले; मात्र त्यावेळीही सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न न सुटल्यास पुन्हा केव्हाही आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी दिला. 

नांदगाव तिठा येथे सध्या सर्व्हिस रस्त्याअभावी अधुन मधून छोटे मोठे अपघात घडत आहेत. मोठा अपघात घडल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. सुरूवातीला आंदोलकांना पुन्हा शाखा अभियंता श्री. कुमावत पुन्हा सामोरे गेले. यावेळीही क्षेत्र हे अपूरे पडत असल्याने या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने सर्व्हिस रस्त्याचे बांधकाम काम करता येत नाही.

यासाठी कार्यालयाने आवश्‍यक असलेल्या जादा क्षेत्राकरीता भूसंपादन प्रस्ताव सादर केलेला असून या अनुषंगाने पुढील कार्यवाही ही भूसंपादन प्राधिकारी यांचे स्तरावर प्रगतीपथावर आहे. याची सर्व पूर्तता झाल्यानंतर सर्व्हिस रस्त्याचे काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले; मात्र त्यांच्याकडून ठोस माहीती मिळत नसल्याने कार्यकारी अभियंता व प्रांताधिकारी यांनी येथे यावे असा पावित्रा आंदोलकांनी घेतला. यानंतर आमदार राणे व श्री. पारकर दाखल झाले. दोन्ही नेत्यांनी एकमेकाला हस्तांदोलन करीत आंदोलन ठिकाणी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर प्रांताधिकारी काही वेळातच दाखल होवून चर्चा करण्यात आली. 

यावेळी आमदार राणे, श्री. पारकर, नांदगांव पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, नांदगांव सरपंच आफोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, शिवसेना शाखा राजा म्हसकर, ओटव सरपंच हेमंत परूळेकर, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, नांदगांव माजी सरपंच संजय पाटील, भाजपा तालूकाध्यक्ष राजन चिके, संतोष कानडे, शिवसेना तालूका प्रमुख शैलेश भोगले, ऍड. हर्षद गावडे, अरूण बापार्डेकर, गवस साठविलकर, मंगेश पाटील, सदस्या वृषाली मोरजकर, रेणूका पाटील , रमिजानबी बटवाले, बाळा मोरये, रवि तेली आदी पदाधिकारी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.