नाणार रिफायनरी मुख्यमंत्र्यांनी रद्द केली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

रत्नागिरी - नाणार येथील रिफायनरी रद्द झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेपुढे स्पष्ट केले. त्यामुळे नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रमोद जठार यांच्या कानात काहीतरी सांगितले असेल, असे सांगत नाणार परत कोकणात येणे अशक्‍य असल्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी सांगितले.

मराठा भवन येथील मेळाव्यात प्रमोद जठार यांनी केलेल्या नाणार विषयीच्या भूमिकेबद्दल राणेंनी रत्नागिरीत पत्रकारांपुढे मत मांडले. ते म्हणाले, नाणार येथे रिफायनरी प्रकल्प आणण्यासाठीची मागणी अनंत गिते, विनायक राऊत यांनी केली होती. जमीन संपादनाची अधिसूचनाही शिवसेनेच्या मंत्र्यांनीच काढली होती. विरोध होऊ लागल्यानंतर त्याचे श्रेय राणे घेत आहेत, असे वाटल्यानंतर शिवसेनेने कोलांटी उडी मारली. त्यांनी विरोध करायला सुरवात केली. त्यामुळे ठाकरेंच्या बोलणाऱ्यावर कोणीच विश्‍वास ठेवत नाही.

मच्छीमारांवर अन्याय होत आहे. एलईडीद्वारे मासेमारी होत आहे. ट्रॉलर्ससह अन्य मच्छीमारांना मासे मिळत नाही. परराज्यातील मच्छीमार झुंडीने येऊन एलईडीचा वापर करून मासेमारी करतात. त्यामुळे कोकण किनाऱ्यावर मत्स्य दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ते गस्त घालणाऱ्या पोलिसांनाही जुमानत नाहीत. यावरुन सरकारच्या क्षमतेवर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Narayan Rane comment