esakal | 'नियती कोणाला सोडत नाही' ; निलेश राणेंकडून पुन्हा ठाकरे कुटुंबावर निशाना
sakal

बोलून बातमी शोधा

MP Nilesh Rane tweet again attention Thackeray family From the Sushant Singh Rajput case

माजी खासदार निलेश राणे यांनी याआधीही आरोप केले होते. आज सकाळी आमदार नितेश राणे यांनी व्टिटरव्दारे टिका केली

'नियती कोणाला सोडत नाही' ; निलेश राणेंकडून पुन्हा ठाकरे कुटुंबावर निशाना

sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

सिंधुदुर्ग :  नियती कोणाला सोडत नाही. याच जन्मात ह्या कुटुंबाला हिशोब द्यावा लागेल, अशा शब्दात व्टिट करत माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे कुटुंबाला पुन्हा लक्ष केले आहे. 

हेही वाचा - ‘अब बेबी पेंग्वीन तो गयो, इट्स शो टाईम’ ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती राणेंची प्रतिक्रिया -

सुशांतसिंग रजपूत प्रकरणावरून सध्या आरोपप्रत्यारोप सुरू आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या प्रकरणाबाबत शिवसेना आणि अप्रत्यक्षरित्या आदित्य ठाकरेंवर टिका केली होती. हे प्रकरण सध्या सीबीआयकडे तपासासाठी आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणातील संशयीत असलेल्या रिया चक्रवर्ती हिने दाखल केलेल्या याचीकेवर सुनावणीही सुरू होती. यावर आज हा तपास सीबीआयकडे द्या असा आदेश न्यायालयाने दिला आहे. 


 

या प्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांनी याआधीही आरोप केले होते. आज सकाळी आमदार नितेश राणे यांनी व्टिटरव्दारे टिका केली होती. त्यापाठोपाठ माजी खासदार निलेश राणे यांनीही पुन्हा व्टिट करत ठाकरे कुटुंबाला टिकेचे लक्ष केले आहे. त्यांनी या व्टिटमध्ये म्हटले आहे की, आयुष्यभर एका कुटुंबाने वाटेल त्याची वाट लावली. बदनामी केली, शिव्या घातल्या, हजारो कुटुंब उध्वस्त केली; पण नियती कोणाला सोडत नाही...ह्याच जन्मात ह्या कुटुंबाला हिशोब द्यावे लागणार. मनाला वाट्टेल तसे हे कारटे वागले; पण आता लोकांकडून फटके खायची वेळ आली. 

संपादन ‌- अर्चना  बनगे  

loading image
go to top