स्वाभिमान असणारे लोक भाजपमध्ये

स्वाभिमान असणारे लोक भाजपमध्ये

रत्नागिरी -  खासदार विनायक राऊत यांनी ज्यांच्या आधारावर निवडणूक जिंकली त्या भाजपला ५ वर्षांमध्ये काहीच दिले नाही. याचा राग भाजपच्या मनात आहे. जिल्ह्यातील भाजपच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. स्वाभिमान असणारे लोक भाजपमध्ये आहेत. त्याचा स्वाभिमानला नक्कीच फायदा होईल, असे विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. भाजपच्या नाराजीचा स्वाभिमानला फायदा होईल का? या प्रश्‍नावर श्री. राणे बोलत होते.   

येथील रायगड बंगल्यावर श्री. राणे यांची पत्रकार परिषद झाली. श्री राणे म्हणाले, शिवसेना-भाजप युतीचा उद्देश शेतकऱ्यांचा प्रश्‍न नाही. राम मंदिर, नाणार प्रकल्प रद्द करण्याबाबत असेल असे वाटत होते. मात्र, युती होऊन ३६ तास होत नाहीत, तोवर मुख्यमंत्री कोणाचा यावरून कपडे फाडत आहेत. सत्तेसाठीचा हा नंगानाच सुरू झाला आहे. त्यांना जनतेच्या प्रश्‍नाचे काही पडलेले नाही, आगामी निवडणुकीत जनताच त्यांना उत्तर देईल 

श्री. राणे म्हणाले, की गेल्या निवडणुकीत जैतापूरचा मुद्दा घेऊन शिवसेनेने निवडणूक लढली. जैतापूर रद्द करू, असे आश्‍वासन दिले. मात्र अजूनही जैतापूर रद्द झालेला नाही, त्याचे काम सुरू आहे. तसेच नाणारबाबत होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर युतीच्या फायद्यासाठी नाणार रद्द करण्याची घोषणा केली, मात्र त्याची अधिसूचना दाखवा आणि नंतर पेढे वाटा. सहा महिने 
नाणार बाजूला ठेवायचा आणि निवडणुका संपल्या, की नाणार पुन्हा जनतेवर लादायचा, आता कोकणवासीयांनी पुन्हा-पुन्हा तीच चूक करू नये. या निवडणुकीत त्यांना अद्दल घडवा. 

रेल्वेने दखल न घेतल्यास आमच्या भाषेत सांगू
कोकण रेल्वेचे प्रश्‍न ५ वर्षे तसेच आहेत. येथील खासदार दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घेत नारळ फोडत फिरत आहेत. पंधरा वर्षांपासूनचे रेल्वे प्रशासनाकडून अनेक विषय प्रलंबित आहेत. ते सांगण्यासाठी आज अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रश्‍नांची दखल घेतली नाही, तर आमच्या भाषेत काय ते सांगू, असा इशारा राणे यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com