मराठा आरक्षणाचे खरे श्रेय नारायण राणेंचे - संभाजीराजे

मराठा आरक्षणाचे खरे श्रेय नारायण राणेंचे - संभाजीराजे

वैभववाडी - मराठा आरक्षणाचे खरे श्रेय नारायण राणेंचे,राणेंमुळेच मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळाले असल्याचे वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. 

वैभववाडीमध्ये महाराणा प्रताप कलादालनाच्या उद्घाटन कार्यक्रमात खासदार संभाजीराजे बोलत होते. या कार्यक्रमास मेवाडहून महाराणा प्रताप यांचे वंशज युवराज लक्ष्यराज सिंह आले होते. तसेच पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार नारायण राणे,  माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे उपस्थित होते. 

संभाजीराजे म्हणाले, आण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी संघटन केले. यातून मराठा समाजाचा लढा सुरू झाला. तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणासाठी अहवाल सादर करण्याचा निर्णय घेतला. पण ही जबाबदारी कोणावर द्यायची यावर चर्चा झाली. यामध्ये एखाद्या कणखर व्यक्तिकडे ही जबाबदारी देण्याचे ठरले. त्याचवेळी कणखर नेतृत्व म्हणून नारायण राणे यांचे नाव पुढे आले. धाडसी निर्णय घेणारे माणूस एकच आहे तो म्हणजे नारायण राणे. यासाठी त्यांच्यावर ही जबाबदारी देण्याचे निश्चित केले. यांनी या कामी परिश्रम घेऊन १६ आरक्षण देण्याचा अहवाल सरकारकडे सादर केला. हा धाडसी निर्णय होता. आत्ताच्या सरकारने आरक्षण दिले असेल पण त्यावेळी हा धाडसी निर्णय घेणारे हे नारायण राणेच होते. त्यांच्यामुळेच आज मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com