पावसमध्येही होमिओपॅथिक हॉस्पिटल उभारू - राऊत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

केंद्र, राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी आमची धडपड सुरू आहे. जागा उपलब्ध करून दिल्यास पावसमध्येही ५० कॉटचे होमिओपॅथिक हॉस्पिटल उभारू, असे आश्‍वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले. 

रत्नागिरी - हार-तुऱ्यांसाठी आमची पदे नाहीत. जनसेवेची आमची भूमिका आहे. १०० टक्के समाजकार्य करून तुमचे आशीर्वाद मिळविण्यातच आम्हाला धन्यता मिळते. केंद्र, राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी आमची धडपड सुरू आहे. जागा उपलब्ध करून दिल्यास पावसमध्येही ५० कॉटचे होमिओपॅथिक हॉस्पिटल उभारू, असे आश्‍वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले. 

पावस जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत प्रमुख उपस्थित होते. 

श्री. राऊत म्हणाले, ‘केंद्र सरकारने सर्व योजना ऑनलाईन केल्या. त्यासाठी लागणाऱ्या कनेक्‍टिव्हिटीसाठी २५ लाखांची तरतूद केली. ‘सरकार’ नावाच्या योजनेमार्फत सर्व योजना गावात पोचल्या आहेत. सात-बारा उताऱ्यांसह दिल्ली, मुंबई, महाराष्ट्रातील, केंद्र, राज्याच्या सर्व योजना गावांपर्यत पोचल्या आहेत. तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक आदींपर्यंत त्या पोचण्याचे प्रभावी माध्यम तयार झाले आहे.’

जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य किरण सामंत, प्रमोद शेरे, दीपक सुर्वे, बंड्या साळवी, शिल्पाताई सुर्वे, सुभाष पावसकर, विनया गावडे, कांचन नागवेकर, आरती तोडणकर, विभागप्रमुख किरण तोडणकर, तालुका सरपंच संघाचे अध्यक्ष विजय चव्हाण आदी उपस्थित होते. 
 
निवडणुकीला तयार - आमदार सामंत 
अटलबिहारी वाजपेयी यांनी बाळासाहेब ठाकरेंविषयी अनेक पुस्तकांमध्ये उल्लेख केला आहे. त्याचा १० टक्के अभ्यास शिवसैनिकांनी केल्यास शिवसेनेचे मताधिक्‍य वाढेल. शिवसेनेत सचिवपदाची निर्मिती बाळासाहेबांनी केली. सचिवपदी विनायक राऊत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. सभा मोठी झाली म्हणजे झाले नाही. शिवसेनेचे विचार रुजविण्याची गरज आहे. संघटना बांधणी एवढी मजबूत आहे की, निवडणुकीला कधीही तयार आहोत, असे मत आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केले.

Web Title: MP Vinayak Raut comment