राणेंची राजकीय अवस्था "लांडगा आला रे आला' सारखी

राणेंची राजकीय अवस्था "लांडगा आला रे आला' सारखी

मालवण - भाजपला पहिल्यांदा युती महत्वाची असून आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा युतीची सत्ता येणार आहे. यामुळे नारायण राणे यांनी आजपर्यंत डझनभर तारखा जाहीर केल्या आहेत आणि यापुढेही करीत राहतील. राणेंची सध्याची राजकीय अवस्था "लांडगा आला रे आला' मधील गोष्टीसारखी झाली आहे, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली. 

तळगाव येथील निवासस्थानी श्री. राऊत हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रसाद मोरजकर तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेसाठी नारायण राणे हा विषय संपलेला आहे. यामुळे त्यांच्या प्रवेशाबाबत काहीही बोलायचे नाही. तो भाजपचा विषय आहे. आम्ही केवळ युतीच्या अंतीम निर्णयाकडे पहात आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप अध्यक्ष 
अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्यावेळीच विधानसभा निवडणुकीसाठी युतीचा निर्णय झालेला आहे.

आता मित्र पक्षांना जागा सोडून इतर जागांवरही निर्णय लवकरच होणार आहे. शिवसेनेला गृहित धरून उमेदवारीचा आकडा दिला जाणार नाही, हे निश्‍चित आहेत. गेल्या काही महिन्यात शिवसेनेमध्ये विद्यमान आमदारांचा पक्षप्रवेश मोठ्या संख्येने झालेला आहे. यामुळे या ठिकाणी पुन्हा त्या आमदारांना संधी देण्याबाबतही पक्षप्रमुख निर्णय घेणार आहे. युतीच्या निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो घेतील तो सर्व शिवसैनिकांना मान्य असणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील सर्वच्या सर्व जागांवर युतीचे उमेदवार विजयी करण्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे, असेही श्री. राऊत म्हणाले. 

राऊत म्हणाले, ""शिवसेनेने नारायण राणेंची हकालपट्टी केल्यानंतर सिंधुदुर्गात ज्या पद्धतीने राणे समर्थकांनी हौदोस घातला होता त्यावर आजच्या निर्णयाने दशहत माजविणाऱ्यांना 
धडा मिळाला आहे. आता कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना तत्काळ पदावरून हटविण्याची कार्यवाही प्रशासनाने करावी, जेणेकरून भविष्यातही अशाप्रकारे राजकीय दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करणारा नाही. आजचा हा निकाल म्हणजे जिल्ह्यातील राजकीय दहशतीचा निकाल असेच वर्णन केले पाहिजे.'' 

नुकसानीचे फेर पंचनामे करा 
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बागायतीचे नुकसान झाले आहे. यामुळे महसूल आणि कृषी विभागाने यासाठी फेर सर्वेक्षण करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावे. जेणेकरून शेतकऱ्यांना शासनस्तरावर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही श्री. राऊत यांनी स्पष्ट केले. याबाबत आपण जिल्हाधिकारी यांच्याशीही चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com