esakal | Sakal Impact : ‘मिऱ्या - नागपूर’चा मोबदला ८ दिवसांत द्या
sakal

बोलून बातमी शोधा

MP vinayak raut said on highway of morya port to nagpur report submitted within 8 days in ratnagiri

वृत्तपत्रातून आलेल्या बातमीची दखल घेऊन तक्रारी वगळून अन्य मोबदल्याचे वाटप करुन आठ दिवसात अहवाल सादर करा

Sakal Impact : ‘मिऱ्या - नागपूर’चा मोबदला ८ दिवसांत द्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत भूसंपादन केलेल्यांना मोबदला देण्यासाठी ९२ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत; मात्र रत्नागिरी प्रातांधिकाऱ्यांकडून झालेल्या हलगर्जीपणातून काही जमीनधारकांना मोबदला वाटप झाले नसल्याचे पुढे आले आहे. वृत्तपत्रातून आलेल्या बातमीची दखल घेऊन तक्रारी वगळून अन्य मोबदल्याचे वाटप करुन आठ दिवसात अहवाल सादर करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.

केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आमदार भास्कर जाधव (व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे), नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार तसेच संबंधित अधिकारी, समिती सदस्य उपस्थित होते.

मिऱ्या-नागपूर महामार्गासाठी जमिनी दिलेल्यांपैकी अनेकांना मोबदलाच वाटप केलेला नसल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. याची दखल खासदार राऊत यांनी घेतली. दिशा समितीमध्ये खासदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. ते म्हणाले, मोबदला वाटपात जमीनधारकांचा काहीच दोष नाही. प्रांताधिकारी यांच्याकडून चालढकलपणा झालेला आहे. तत्काळ पैसे मिळणे हा, त्यांचा हक्‍कच आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पुन्हा असा प्रकार घडणार नाही, याची काळजी घेतली जाईल. बैठकीत घेतलेल्या निर्णयाविषयी ते म्हणाले, कृषि क्षेत्रात उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. बॅंकांनी कर्ज पुरवठा करताना लाभार्थ्यांच्या त्रुटी लक्षात घेऊन काम करा, अशा सूचना दिल्या आहेत. 

हेही वाचा - एकही शिवसैनिक भाजपात जाणार नाही -

वीजबिलांमध्ये मिळणार सूट

कोरोना कालावधीत आलेल्या वीजबिलांच्या अव्वाच्या सव्वा बिलांविषयी राज्य शासनाकडून ग्राहकांना दिवाळी भेट दिली जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विशेष योजना जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. युनिटनुसार सूट देण्याचा विचार सुरू असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top