बहुजन समाजाने एकवटण्याची निर्णायक वेळ -सुरेखा खेराडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

चिपळूण - सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या बहुजन समाजावर सातत्याने अन्यायच झाला. निवडणुकीच्या तोंडावर बहुजनातील विविध जातींमध्ये भांडणे लावली जातात. उत्कर्षासाठी एकजूट महत्त्वाची आहे. बहुजन समाज 85 टक्के आहे. त्यामुळे 15 टक्के लोकांची हुकूमशाही उखडून टाकण्याची वेळ आली आहे. समाजातील दुजाभाव मोडून बहुजन समाज एकवटण्याची हीच निर्णायक वेळ आहे. त्यासाठी कोअर कमिटी स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे, असे मत नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांनी व्यक्त केले.

बहुजन समाजातील विविध जाती-संघटनांची आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात सहविचार सभा झाली. या वेळी विविध समाजांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महेंद्र कदम यांनी प्रास्ताविक केले. सौ. सुरेखा खेराडे म्हणाल्या, ""सर्वत्र सत्ताधारी असलेल्या 15 टक्के लोकांची हुकूमशाही उखडून टाकण्याची हीच वेळ आहे. समाजातील जातीपातीच्या भिंती तोडण्याची प्रक्रिया स्वतःच्या घरापासूनच सुरू करू या. बहुजन समाजातील महिलांमध्ये सुप्त शक्ती आहे, तिची वृद्धी होण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. नगराध्यक्षपदी बहुजन समाजाचा प्रतिनिधी बसल्याचा मला अभिमान आहे. समाज संघटित होऊन काय करू शकतो हे दाखवून देऊया.''

रोहिदास समाज, त्वष्टा कासार, गवळी, कुणबी, कुंभार, चांभार, वाणी, कातकरी आदी समाजाच्या प्रतिनिधींनी एकजुटीच्या भावना व्यक्त केल्या. सभेला कुणबी समाजाचे दादा बैकर, विलास खेराडे, प्रदीप उदेग, संजय जांबरे, सुरेश भिसे, चंद्रकांत जाधव, सुभाष गुडेकर, प्रकाश साळवी, डॉ. सौ. गजमल, सीताराम शिंदे, रमेश राणे, सुभाष जाधव, उदय कदम, मंगेश चिपळूणकर आदींसह ग्रामीण भागातील बहुजन समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: Mrs. Mayor. Surekha kherade

टॅग्स