मल्टिस्पेशालिटीप्रश्नी दोन गट...आता दोडामार्गवासीयांच `हे` मत

multispeciality hospital issue sawantwadi konkan sindhudurg
multispeciality hospital issue sawantwadi konkan sindhudurg

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलवरून सध्या दोन गट पडले आहेत. एरवी सगळ्या राज्यकर्त्यांनी नेहमीच दोडामार्गवर अन्याय केला आहे. त्यामुळे यावेळी येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभे करून तालुकावासीयांना न्याय द्यावा, अशी मागणी सरपंच सेवा संघाचे जिल्हा संघटक प्रवीण गवस यांनी केली आहे. 

तालुक्‍यात अनेक एकर शासकीय जागा पडून आहे. त्यावर हॉस्पिटल उभे करून बांबोळीला पर्याय उभा करा, असेही ते म्हणाले. श्री. गवस पुढे म्हणाले, ""निवडणुका आल्या की, सगळेच राजकीय पदाधिकारी, आमदार, खासदार आपले दोडामार्गवर प्रेम आहे, आम्ही दोडामार्गसाठी हे करू ते करू म्हणून सांगतात आणि प्रत्यक्षात दोडामार्गला वाळीत टाकल्याप्रमाणे वागणूक देतात.

सातत्याने होणारा अन्याय आम्ही आणखी किती काळ सोसायचा? त्यामुळे एक तर सध्या वादात सापडलेले मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल दोडामार्गमध्ये उभे करावे अन्यथा दोडामार्गवासीयांना आरोग्याच्या हक्कासाठी आणि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी लढा उभारावा लागेल.''  ते पुढे म्हणाले, ""मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी झरेबांबर विमानतळ येथे सरकारी मालकीची कित्येक एकर जमीन आहे. येथील ग्रामीण रुग्णालयाजवळही पुरेशी जागा आहे.

येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर असले तरी आवश्‍यक साधनसामुग्री नाही, वैद्यकीय अधिकारी नाही, इमारत नाही. त्यामुळे सगळ्यांना बांबोळी इस्पितळावर विसंबून राहावे लागते. ते चित्र बदलण्याची गरज आहे. आपला जिल्हा आरोग्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभे करावे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com