मुंबई-गोवा महामार्गावरील हे दोन पूल वाहतुकासीठी तात्पुरते राहणार बंद

राजेश कळंबटे
Tuesday, 8 September 2020

राष्ट्रीय महामार्गावरील पुलांचे ऑडीट करण्यासाठी एजन्सी नेमण्यात आली आहे.

रत्नागिरी : राष्ट्रीय महामार्ग विभागाने मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीवरील पूल आणि संगमेश्वर येथील शास्त्री पुलाचे सुरक्षिततेसाठी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत आहे. त्यासाठी 10, 11, 12 सप्टेंबर या तारखा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्या दिवशी दिलेल्या वेळेत पुलावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बंद केली जाईल असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.

राष्ट्रीय महामार्गावरील पुलांचे ऑडीट करण्यासाठी एजन्सी नेमण्यात आली आहे. या दोन्ही पुलांवरुन दिवसभर वाहतूक सुरु असते. तपासणी करताना वाहतूक बंद ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आदेश काढण्यात आले आहेत. वाहतूकीसाठी पर्यायही यामध्ये सुचविण्यात आले आहेत. वाशिष्ठी पूलाकसाठी पर्यायी रस्ता म्हणून चिपळूण बायपास फरशी तिठा हा मार्ग असेल तर शास्त्री पुलाकरीता पर्यायी रस्ता शास्त्री पूल कसबा अंत्रवली फाटा, कडवई-तुरळ या मार्गाचा वापर करता येईल. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आदेशानुसार चिपळूण शहरातील वाशिष्ठी पुल क्र 1 वरील सर्वप्रकारची वाहतूक 10 सप्टेंबरला दुपारी 12 ते 4 या वेळेत आणि पुल क्र. 2 वरील वाहतूक 11 सप्टेंबरला दुपारी 12 ते  4 वेळेत  बंद ठेवण्यात येणार आहे.

हे पण वाचा महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय ; आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांची पेन्शन बंद 

दोन्ही पुलावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून फरशी तिठा हा ठेवण्यात आला आहे. संगमेश्वर येथील शास्त्री नदीवरील शास्त्री पूलावरील वाहतूक 12 सप्टेंबरला दुपारी 12 ते 4 या वेळेत बंद राहील. या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

हे पण वाचा - रत्नागिरीकरांची चिंता वाढणार; कोरोना रूग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Goa highway bridge will be closed for three days