मुंबई-गोवा महामार्ग दीड तास ठप्प

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

खेड तालुक्यात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस असून जगबुडी, नारंगी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महामार्गालगत वाहणार्‍या चोरटी नदी पात्र विस्तारल्याने महामार्गावरती सुमारे तीन फुट पाणी आहे.

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील उधळे-बोरघरच्या दरम्यान रस्त्यावर पाणी आल्यामुळे महामार्ग दीड तास ठप्प झाला आहे. दोन्ही बाजूने लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. 

खेड तालुक्यात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस असून जगबुडी, नारंगी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महामार्गालगत वाहणार्‍या चोरटी नदी पात्र विस्तारल्याने महामार्गावरती सुमारे तीन फुट पाणी आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून महामार्ग बंद करण्यात आला आहे.

त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने लांबच्या लांब रांगा दिसत आहेत

Web Title: mumbai-goa highway closed due to rain