मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण मे महिन्यात?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

कणकवली  - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रारंभ मे महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. या अनुषंगाने शुक्रवारी (ता. 7) केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली.

महामार्ग चौपदरीकरणासाठी इंदापूर ते झारापपर्यंत सहा एजन्सीची नियुक्‍ती केली आहे. याखेरीज पन्नास टक्‍के मोबदलादेखील भूसंपादन विभागाकडे वर्ग केला आहे. उर्वरित मोबदलाही वर्ग करून तो प्रकल्पग्रस्तांच्या बॅंक खात्यांत लवकरात लवकर जमा केला जावा आणि महिन्यात चौपदरीकरण कामाचा प्रारंभ होण्याबाबतची निश्‍चिती या बैठकीत होणार आहे.

Web Title: mumbai-goa highway development