चौपदरीकरणातील पुलांची कामे संथ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावरील पुलांची कामे त्वरेने सुरू झाली, मात्र त्यानंतर त्यांची गती संथ झाल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून केंद्र सरकारला कळविण्यात आले आहे. पुलांचे काम वेगाने व्हावे, यासाठी दर तीन महिन्यांनी हा अहवाल पाठविण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून आल्या आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण वेगाने व्हावे यासाठी केंद्रस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत.

फेब्रुवारी २०१८ मध्ये ठेकेदारांमधील वादावर तोडगा काढण्यात केंद्र स्तरावर यश आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारांना कामाची पूर्ततेसाठी सशर्त मुदतवाढही दिली. पुलांच्या कामाच्या प्रगतीचा अहवाल दर तीन महिन्यांनी केंद्र सरकारला पाठविणार असल्याचे त्यात नमूद केले होते.

पावसाळ्यापूर्वी कोणती काम पूर्ण करणार याबाबत कंपनीकडून वायदा घेण्यात आला आहे. मे महिन्यात चौदापैकी केवळ चारच पुलांची कामे सुरू केली आहेत. उर्वरित कामांबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. पुलांची कामे संथ गतीने सुरू असल्याचे तीन महिन्यांच्या अहवालात आढळून आले आहे. तसे पत्र नुकतेच केंद्र सरकारला पाठविण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

रस्त्यांचे काम सुरू करण्यापूर्वी पूल तयार करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली होती. यामध्ये बारा पूल आणि दोन रेल्वे ओव्हरब्रीजच्या कामाचा समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी या कामांना आरंभ झाला; मात्र ठेकेदारांच्या गोंधळात ही कामे रखडली. जगबुडी, वाशिष्ठी, आरवली, सोनवी, सप्तलिंगी, बावनदी यांच्यासह चौदा पुलांसाठी १८७ कोटी रुपये मंजूर आहेत. त्यातील दीडशे कोटींच्या कामांना सुरवात झाली.

साठ टक्‍के कामे पूर्ण झाल्यानंतर मुख्य ठेकेदार आणि पोट ठेकेदारांतील वादात त्यांना खो बसला. ठेकेदार बदलण्याची भूमिका सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आली होती. बांधकाम विभागाने सुमारे ६४ कोटी रुपये ठेकेदाराला दिले होते. जानेवारी २०१८ मध्ये संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करून पोट ठेकेदारालाच काम द्यावे असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेला होता.

झाडे तोडण्याचे काम सुरू
पावसाळ्यातील चार महिन्यांत चिपळूण ते राजापूर टप्प्यातील झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर काँक्रिटीकरणाला सुरवात केली जाणार आहे.

Web Title: Mumbai - Goa Highway four track issue