मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे सिंधुदुर्गातील काम 95 टक्के पूर्ण.....

Highway
Highway

कणकवली : महामार्ग चौपदरीकरणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ ते झाराप या 43 किलोमीटर टप्प्यातील 95 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. फक्‍त कुडाळ आणि कणकवली शहरातील काम शिल्लक राहिले आहे. दरम्यान, शहरातील उड्डाणपुलाच्या भिंतीचा जो भाग कोसळला आहे, तो नव्याने बांधून देण्याचे निर्देश महामार्ग ठेकेदाराला दिल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता सलीम शेख यांनी आज येथे दिली. 

चौपदरीकरणाचे काम सिंधुदुर्गात दोन टप्प्यात सुरू आहे. यातील कणकवली शहर ते झाराप या 43.905 किलोमीटरपैकी 40.29 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. कणकवली आणि कुडाळ शहरातील प्रत्येकी दीड किलोमीटरचे काम अपूर्ण स्थितीत आहे. शहरातील 43 गाळे असलेल्या 1260 मीटर लांबीच्या फ्लायओव्हर व पोहच मार्गापैकी मुंबईच्या दिशेला 429 मीटर व गोव्याच्या दिशेला 255 मीटर काम व फ्लायओव्हरचे 15 गाळ्यांचे काम मार्च 2020 अखेर पूर्ण होणार होते. कोविड-19 महामारीमुळे हे काम करता आले नाही, असे श्री. शेख म्हणाले. 
चौपदरीकरणाच्या कामावर देखरेख करण्यासाठी मे. आर्टिफक्‍ट प्रोजेक्‍ट लि. या कंपनीने स्वतंत्र अभियंत्याची नेमणूक केली आहे. या प्रकल्पाच्या नकाशांना मंजुरी देणे व त्याबरहुकूम काम करून घेण्याची पूर्णतः जबाबदारी या कंपनीवर सोपविल्याचीही माहिती श्री. शेख यांनी दिली. 

पाणी गेल्याने भिंत कोसळली 
फ्लायओव्हर जोडरस्त्याच्या भरावामध्ये पावसाचे पाणी गेल्याने दाब वाढला आणि भिंत कोसळल्याची माहिती शेख यांनी दिली. त्यामुळे या जोडरस्त्याच्या भरावाचे काम पूर्णतः काढून नव्याने आणि ठेकेदाराने स्वखर्चाने बांधकाम करण्याचे निर्देश दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीला दिले आहेत. चौपदरीकरणाच्या बांधकामाची पुढील पंधरा वर्षांची जबाबदारीही याच ठेकेदारावर असून त्या कामावर देखरेखीची जबाबदारी आर्टिफॅक्‍ट प्रोजेक्‍ट या कंपनीकडे आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com