चौपदरीकरणातील नव्या मोरीचा एका बाजूचा भराव ढासळला

पेढे-सवतसडा येथील प्रकार; डागडुजीचे काम सुरू
Mumbai Goa National Highway Pede Savatsada road One side collapsed rain
Mumbai Goa National Highway Pede Savatsada road One side collapsed rainsakal

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील कॉंक्रिटवर तडे गेल्याचे समोर आलेले असतानाच गुरुवारी झालेल्या पावसात पेढे सवतसडा येथील नव्या मोरीचा एका बाजूचा भराव ढासळला आहे. शुक्रवारी कंत्राटदार कंपनीकडून डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे.

महामार्गावर परशुराम ते लोटे आणि कापसाळ ते कामथे या खेड आणि चिपळूण टप्प्यातील चौपदरीकरणात करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणास जागोजागी तडे गेले आहेत. काही ठिकाणी महामार्ग खचलाही आहे. महामार्गावर ज्या ज्या ठिकाणी तडे गेले आहेत, तिथे अद्याप दुरुस्ती झालेली नाही. यापूर्वी पहिल्या टप्प्यात रस्त्याच्या कडेला गटारांचे बांधकाम झाले. ही गटारे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोसळली आहेत, तर अनेक ठिकाणी त्यास तडे गेले आहेत.

त्यामुळे कामे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात करण्यात आलेल्या या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. असे असतानाच पावसामुळे सवतसडा येथील मोरीचा एका बाजूचा भराव ढासळला. महिनाभरापूर्वीच या मोरीचे काम पूर्ण करून त्यावर कॉंक्रिटकरण करण्यात आले आहे. एका बाजूचा मातीचा भराव ढासळला असला तरी त्यामुळे कॉंक्रिटकरणाला कोणताही धोका नसल्याचे राष्ट्रीय महामार्गचे अभियंता तसेच कंत्राटदार कंपनीचे म्हणणे आहे. शुक्रवारी भराव ढासळलेल्या ठिकाणी कंत्राटदार कंपनीकडून उपाययोजना करण्याचे काम हाती घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com