पालिकेची मोहीम - प्लास्टिकमुक्तीसाठी धडक कारवाई

चार दिवसांत ५२, ५०० रु. दंड; मास्क न वापरणे पडले भारी
plastic use
plastic usesakal

रत्नागिरी : जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील(Collector Dr.B.N.Patil) यांनी प्लास्टिकमुक्तीचा संकल्प सोडला आहे. स्वच्छता आणि पर्यटनवाढीच्या अनुषंगाने जिल्ह्यात प्लास्टिकविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. रत्नागिरी शहरामध्ये पालिकने गेल्या चार दिवसांमध्ये ६२ जणांवर कारवाई करून ५२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर विनामास्क फिरणाऱ्यांविरोधातही कारवाई सुरू आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये आठ जणांवर कारवाई करून चार हजारांचा दंड वसूल केला.

plastic use
शरद पवारांच्या अडमुठ्या धोरणामुळं ६७ कष्टकऱ्यांचा जीव गेला - सदावर्ते

जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी यापूर्वीच त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे. सर्व अधिकाऱ्यांना सूचना देऊन शासकीय कार्यालयाची स्वच्छता करण्यात आली. जिल्ह्यातील किनारपट्टींवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी पाटील स्वतः या मोहिमेत सहभागी होत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी ती यशस्वी झाली आहे; मात्र या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक सापडले. या प्लास्टिकमुळे पावसाळ्यात गटार तुंबून पाणी शहर आणि घरांमध्ये शिरते. समुद्रातही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जाते. पाण्यातील जीवांवर याचा मोठा परिणाम होतो म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी प्लास्टिकमुक्तीच्या दृष्टीने संकल्प सोडला आहे. त्याची अंमलबजावणी शहरी आणि ग्रामीण भागात सुरू झाली आहे. व्यापाऱ्यांबरोबर बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी आता प्लास्टिक पिशव्या मिळत नाहीत.

plastic use
खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटलेल्या मुलासह वडिलांचा खून

टपऱ्यांचीही तपासणी सुरू

अनेकजण राजरोस प्लास्टिक पिशव्यांची विक्री करत आहेत. त्याच्या विरोधात पालिकेच्या मालमत्ता विभागाचे पथक राबत आहे. वेगवेगळ्या दुकानांची, टपऱ्यांची तपासणी सुरू आहे. ७ ते ११ जानेवारीपर्यंत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ६२ जणांकडे प्लास्टिक पिशव्या सापडल्या. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क अनिवार्य केले तरी ते न वापरणाऱ्या ८ जणांवर कारवाई करून चार हजार दंड वसूल केला.

एक नजर

  • ६२ जणांवर कारवाई ५२ हजार ५०० दंड

  • विनामास्क आठ जणांवर कारवाई चार हजारांचा दंड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com