जमिनीच्या वादातून देवगड तालुक्यात युवतीचा खून

जमिनीच्या वादातून देवगड तालुक्यात युवतीचा खून

देवगड - जमीन जागेच्या वादातून एका तरुणीच्या खुनाचा प्रकार तालुक्‍यातील कातवणेश्‍वर येथे घडला. प्रीतम शशिकांत सावंत (वय ३५) असे तिचे नाव आहे. जखमी अवस्थेतील प्रीतमला कणकवली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता तिचा  मंगळवार (ता.१३) रात्री साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाला.

याबाबत संशयित म्हणून प्रीतमचा चुलता आनंद शंकर सावंत (वय ३९) आणि चुलत चुलता विजय दत्तात्रय सावंत (५५) याला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुधीर शिंदे यांनी दिली. प्रीतमची आई ज्योत्स्ना शशिकांत सावंत (६६) यांनी फिर्याद दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आनंद प्रीतमच्या घरी आला होता. एका ठिकाणी ठेवलेल्या तांदळाच्या गोणी उचलण्यासाठी चल, असे सांगून तिला घरातून बोलावून नेले. जाताना आपली लहान बॅटरी प्रीतमच्या घरी ठेवून त्यांची मोठी बॅटरी नेली. बराचवेळ झाला तरी प्रीतम घरी आली नसल्याने तिला बघण्यासाठी आई गोणी आहेत म्हणून सांगितलेल्या ठिकाणी गेली; मात्र तेथे कोणीच नव्हते.

आई घरी परतल्यावर घरापासून काही अंतरावर प्रीतमच्या ओरडण्याचा आवाज आला. आईने आवाजाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. थोड्यावेळाने आनंद घामाघूम होऊन घाबरलेल्या स्थितीत आला आणि त्याने त्यांची बॅटरी देऊन आपली बॅटरी नेली. प्रीतम कुठे आहे, अशी विचारणा आईने केल्यावर कोणाकडे तरी गेल्याचे सांगितले. स्थानिकांनी आनंदने सांगितलेल्या ठिकाणी शोध घेतला; मात्र तेथेही प्रीतम नव्हती.

स्थानिकासोबत अंधारात शोध घेत असता प्रीतमच्या विव्हळण्याचा आवाज आला. त्यामुळे आवाजाच्या दिशेने तिचा शोध घेतल्यावर साडेसातच्या सुमारास एका कलम बागेतील दगडी कुंपणाजवळ प्रीतम जखमी अवस्थेत डाव्या कुशीवर विव्हळत पडल्याचे आढळले. तिच्या डोकीला दुखापत झाल्याने तिची प्रकृती गंभीर बनली होती. तिला स्थानिकांच्या मदतीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून अधिक उपचारासाठी तिला कणकवली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे रात्री साडेबाराच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी मध्यरात्रीच संशयित म्हणून प्रीतमचा काका विजय तसेच चुलत चुलता आनंद याला ताब्यात घेतले. आनंदची प्रीतमवर वाईट नजर होती, तर विजयशी जमीन जागेच्या कारणावरून वैमनस्य होते. आज सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी मुळीक, पोलिस निरीक्षक सुधीर शिंदे, सहायक पोलिस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, पोलिस नाईक मनोज पुजारे, पोलिस सुप्रिया भागवत यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. प्रीतमच्या डोकीवर ठिकठिकाणी गंभीर दुखापत करून मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com