हर्णैत एकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

दाभोळ - तालुक्‍यातील हर्णै येथे आज संध्याकाळी झालेल्या हाणामारीत एकाचा खून झाला. अन्य दोघे जखमी झाले. या प्रकाराबाबत फिर्यादी देण्याचे आणि गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत दापोली पोलिस ठाण्यात सुरू होते.

दाभोळ - तालुक्‍यातील हर्णै येथे आज संध्याकाळी झालेल्या हाणामारीत एकाचा खून झाला. अन्य दोघे जखमी झाले. या प्रकाराबाबत फिर्यादी देण्याचे आणि गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत दापोली पोलिस ठाण्यात सुरू होते.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - हर्णै बाजारमोहल्ला येथे राहणारे इम्तियाझ रज्जाक मेमन (वय ४२) यांच्या विरोधात माजीद महालदार यांनी किरकोळ स्वरूपाची मारहाण केल्याची तक्रार आज दापोली पोलिस ठाण्यात दिली होती, तर मजीद महालदार व अन्य दोघांविरोधात इम्तियाझ मेनन यांच्या पत्नीने काल रात्री उशिरा विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. आज दुपारी इम्तियाझ मेमन यांनी मजीद महालदार यांच्या डोक्‍यावर सुऱ्याने वार केला. या वेळी हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या इम्रान माखजनकर यालाही इम्तियाझ यांनी मारहाण केली. याच वेळी इम्तियाझ मेमन यांनाही मारहाण करण्यात आली होती; मात्र ती कोणी केली हे अजून कळू शकले नाही. या मारहाणीत इम्तियाझ मेमन यांचा मृत्यू झाला आहे.

मजीद महालदार व इम्रान माखजनकर यांना संध्याकाळी सहाच्या दरम्यान दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. इम्तियाझ मेमन मारहाण झालेल्या जागीच पडलेले होते. त्यांना सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते; मात्र ते मृत्युमुखी पडले असल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले.

या घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयात व पोलिस ठाण्यात गर्दी झाली होती. तक्रार दाखल करण्याचे काम दापोली पोलिस ठाण्यात सुरू आहे. त्यामुळे या संदर्भातील मारहाणीचा तपशील उपलब्ध झाला नाही.

Web Title: murder in Harne