डोक्‍यात दगड घालून वेडसर महिलेचा खून 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

कुडित्रे- कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर खुपिरे (ता. करवीर) हद्दीत रस्त्यावरून फिरणाऱ्या अज्ञात वेडसर महिलेच्या डोक्‍यात दगड घालून खून केला. रात्री ही घटना घडली. घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक हर्ष पोतदार, करवीरचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी भेट दिली. 

खुपिरे हद्दीतील "धनगर नाळ' नावाच्या शेतातत भिकाजी हराळे यांच्या शेतात वैरण काढण्यासाठी आलेल्या सर्जेराव घराळे यांना सकाळी अज्ञात महिलेचा मृतदेह दिसला. त्यांनी पोलिसपाटील सविता गुरव यांना याची माहिती दिली. पोलिसपाटील यांनी करवीर पोलिसांत वर्दी दिली. 

मुख्य रस्त्याला असणाऱ्या शेतवडीतील पाणंद रस्त्यावर 300 फूट आत उसाच्या शेतात या वेडसर महिलेच्या डोक्‍यात दगड घालून खून केला. महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. डाव्या हातावर गजाने वार केल्याने हात मोडला होता. तसेच शेजारी कपड्याचे गाठोडे, नारळ पडले होते. गेली दोन दिवस ही महिला कोपार्डे येथे तसेच खुपिरे, वाकरे फाटा येथे फिरताना नागरिकांनी पाहिली होती अशी चर्चा घटनास्थळी होती. 

वाहतूक कोंडी 
घटनास्थळी सकाळी 9 वाजता पोलिस पोचले होते. पंचनामाही झाला. मात्र पोलिस उपअधीक्षक हर्ष पोतदार अडीच तासांनी आले. आपण येत नाही तोपर्यंत मृतदेह न हलविण्याच्या त्यांनी सूचना दिल्याने पोलिस फौजफाटा ताटकळत उभा होता. यामुळे कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर वाहतुकीची गर्दी झाली. 
 
Web Title: murder of women by unknown person