आदिवासींच्या हाती दोन पैसे, खवय्यांची चंगळ 

अमित गवळे 
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पाली - हेल्थफूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अळंबीचा हंगाम सध्या सुरु झाला आहे. रानात नैसर्गिकरित्या उगवलेल्या अळंबी बाजारात विक्रिसाठी येत आहेत. त्यामूळे खवय्यांची चंगळ होत आहे. 

पाली - हेल्थफूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अळंबीचा हंगाम सध्या सुरु झाला आहे. रानात नैसर्गिकरित्या उगवलेल्या अळंबी बाजारात विक्रिसाठी येत आहेत. त्यामूळे खवय्यांची चंगळ होत आहे. 

जिल्ह्यात ठिकठिकाणी अळंबी विकणार्या आदिवासी महिला दिसत आहेत.  पावसाळ्यात नैसर्गीकरित्या उगवणार्या या अळंबीला सर्वत्र खुप मागणी असते.  बाजारात ३० ते ४० रुपये वाट्याने पुर्ण फुललेली अळंबी मिळते. तर गोल अळंबीचा एक वाटा ६० ते ७० रुपये दराने मिळत आहे. त्यामुळे आदिवासी महिलांना देखिल चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. अळंबी किंवा मशरुम म्हंटले की शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारच्या खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र हॉटेल किंवा बंद पाकिटात मिळणार्या अळंबीपेक्षा या मोसमात मिळणार्या नैसर्गिक अळंबिला खवय्ये अधिक पसंती देतात.

पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या अळंबी खाण्यास अतिशय चिवष्ठ व आरोग्यवर्धक असतात. या हंगामात मिळणार्या अळंबीचा आवर्जुन आस्वाद घेतो. पाकिटबंद अळंबीपेक्षा हि अळंबी खुप चांगली आहे.
सुहास पाटील, अळंबी खवय्य, पेण

काय आहे अळंबी? 
अळंबी हि बुरशी गटातील वनस्पती आहे. अळंबीला इंग्रजीमध्ये मशरुम असे म्हणतात. पावसाळ्यात निसर्गात अळंबी आढळते.तसेच व्यापारी स्वरुपात लागवड देखिल केली जाते. ग्रामीण भागात कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोंडे व धिंगरी आदी नावाने अळंबी ओळखली जाते. निसर्गात विविध प्रकारच्या अळंबी आढळतात. त्यातील काही विषारीसुद्धा असतात. जगात अळंबीच्या जवळपास १२ हजारहून अधिक जाती आहेत. भारतात बटन, शिंपला आणि धानपैंढ्यावरील मशरुम खाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची लागवड देखिल केली जाते. 

अळंबीचे औषधी गुणधर्म 
अळंबीमध्ये जास्त प्रथिने, लोह, तांबे, तंतुमय पदार्थ व कमी उर्जा असते. जिवाणू आणि विषाणूंना प्रतिकारक असलेली प्रथिने अळंबीत असतात. रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करणारे घटक असतात.अळंबीतील प्रथिनांमध्ये शरीरवाढीसाठी आवश्यक त्या सर्व अमिनो आम्लांचा समावेश असून ती भाजीपाल्यातील प्रथिनापेक्षा उच्च प्रतींचे व पचनास हलकी असतात. मुत्रपिंडाच्या रोगावर उपयुक्त . 'क' व 'ब-२' जिवनसत्व अधिक असते.

Web Title: mushrooms season are now starts