"माझी कन्या भाग्यश्री'चा लाभ घेण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

सिंधुदुर्गनगरी - राज्याने सुकन्या योजना विलीन करून माझी कन्या भाग्यश्री ही नवी योजना अमलात आणली आहे. लेक वाचवा अभियानाला पाठबळ देण्यासाठीच्या या योजनेचा सिंधुदुर्गातील लाभार्थ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह व महिला बालकल्याण सभापती रत्नप्रभा वळंजू यांनी केले आहे.

मुलींच्या जन्माबाबत समाजात सकारात्मक विचार आणणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे, मुलींच्या शिक्षण व आरोग्यात सुधारणा करणे, उज्ज्वल भवितव्याकरिता आर्थिक तरतूद करणे, बालविवाह रोखणे असा या योजनेचा उद्देश आहे. यासाठी योजनेचे लाभार्थी दोन प्रकारचे आहेत. एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंब नियोजन केले आहे. दुसऱ्या प्रकारात एक मुलगी आहे आणि मातेने दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे. एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास लाभ मिळणार नाहीत.

यात जन्मलेल्या बाळाचा जन्मोत्सव साजरा करण्याकरिता पहिल्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास 5 हजार रुपये व दुसऱ्या मुलीस 2 हजार 500 रुपये देण्यात येतील. मुलीस वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1 लाख विम्याची रक्कम देण्यात येईल. अंगणवाडी ते उच्च माध्यमिक शाळेपर्यंतच्या काळात पोषण आहार तथा वस्तुरूपात लाभ मिळेल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंह व सभापती श्रीमती वळंजू व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) सोमनाथ रसाळ यांनी केले आहे.

Web Title: "My daughter appealed to benefit bhagyashree