आमचं ठरलयं ! गावाचा विकास 'असा' करायचा; कसा ते जरूर वाचा

Nachane In Ratnagiri As Competitive Examination Village
Nachane In Ratnagiri As Competitive Examination Village

रत्नागिरी :  येथील नाचणे ग्रामपंचायतीने राज्यात वेगळा आदर्श ठेवला आहे. पंचायतीचे काम पायाभूत सुविधांपुरते मर्यादित न ठेवता "स्पर्धा परीक्षेचे गाव' म्हणून नवी ओळख निर्माण करण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षांवर असलेली खासगी क्‍लासेसची मक्तेदारी मोडित काढत रत्नागिरीतील हुशार मुलांना उच्चपदस्थ ठिकाणी जाण्याची संधी निर्माण करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशात हे गाव एक रोल मॉडेल ठरेल, अशी ग्वाही नाचणे ग्रामपंचायतीच्या सरपंच जयाली घोसाळे यांनी दिली. 

ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयात पत्रकार परिषदेत झाली. यावेळी त्या म्हणाल्या , मुंबई , पुणे आदी शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेचे खासगी क्‍लासेस जोरात चालतात . त्या तुलनेत कोकणातून या स्पर्धा परीक्षांमध्ये कमी मुले असल्याचा वारंवार आरोप होतो. जिल्ह्यातील मुलांना या परीक्षांसाठी बसायचे असेल तर मोठ्या शहरांमध्ये क्‍लासेस त्यांची फी, राहणे, जेवण्याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे हुशार असूनही मुलांना संधी मिळत नाही .

पुस्तकांचे गाव असू शकते तर...

नंदकुमार परब हे स्पर्धा परीक्षेचे क्‍लासेस घेतात. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ही नवी संकल्पना आमच्यासमोर ठेवली . पुस्तकांचे गाव असू शकते . मग नाचणे हे स्पर्धा परीक्षेचे गाव का बनू शकत नाही . म्हणून त्यांच्या पुढाकारातून आम्ही नाचणे गावातून स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी घेण्याचा उपक्रम हाती घेतला, असे सरपंच घोसाळे यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच प्रशांत रसाळ, ग्रामविकास अधिकारी सावके, आबा घोसाळे, संदीप सावंत आदी सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा - लोकमान्य टिळकांचे जन्मस्थळ विकसित कधी होणार ? 
 
शैक्षणिक पर्यटन शक्‍य 

शैक्षणिक पर्यटन गावी आणण्याचा यातून दुसरा उपक्रम राबविला जाणार आहे. रत्नागिरीत इंजिनिअर, आयटीआयमध्ये बहुतांशी बाहेरची मुले शिकण्यासाठी येतात. ते विद्यार्थी तेथेच पेंइंगगेस्ट म्हणून राहातात, तेथे पर्यटन करतात. स्पर्धा परीक्षेचे गाव म्हणून नाचणे विकसित झाल्यास येथे शैक्षणिक पर्यटन शक्‍य होईल, असे नंदकुमार परब यांनी स्पष्ट केले. 
 
मुलगा हुशार आहे, परंतु .. 

बारावी आणि पदवीधर असलेली 100 मुले निवडून त्यांची चाळणी परीक्षा घेतली जाईल. ज्या क्षेत्रात मुलांचा कल आहे, ते क्षेत्र निवडून त्यावर त्यांचा अभ्यास घेतला जाणार आहे. मुलगा हुशार आहे, परंतु त्याची आर्थिक परिस्थिती नाही, असे असेल तर ग्रामपंचायत त्याचा खर्च उचलण्यास तयार आहे. ग्रामपंचायत हॉलमध्ये क्‍लासेस घेतले जातील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com