दोन तरुणांनी बनविले नाचणी मळणी यंत्र

दोन तरुणांनी बनविले नाचणी मळणी यंत्र

चिपळूण - शेतकऱ्यांची गरज ओळखून कौंढर काळसूर येथील तरुण शेतकरी विकास जोशी व सचिन गुजर यांनी नाचणी मळणी यंत्र तयार केले. सह्याद्री निसर्ग मित्रच्या सहकार्याने त्यास पेटंटही मिळाले. या यंत्राच्या साह्याने साधारपणे ३०० रुपयांत ४ मण नाचणीची मळणी होणार आहे. 

ग्रामीण भागातील तरुणांमध्ये कल्पकता आहे. ते आपल्या परीने कामात सोपेपणा आणण्यासाठी नवनवीन कल्पना लढवून नावीन्यपूर्ण गोष्टी करतात, हे सचिन गुजर व विकास जोशी यांनी सिद्ध केले. या दोघांनी बनवलेल्या या नाचणी यंत्राची माहिती सह्याद्री निसर्ग मित्रच्या पदाधिकाऱ्यांना समजली. शेतकऱ्यांचे श्रम कमी करणाऱ्या या यंत्राचे श्रेय मालकी पेटंट अन्वये नोंद करण्याची गरज लक्षात आल्यावर संस्थेने त्यांच्याकडील माहिती घेतली.या दोघांना यंत्राचे पेटंट मिळण्यासाठी संस्थेचे सुयोग विचारे, नितीन नार्वेकर, भाऊ काटदरे यांनी सर्वतोपरी मदत केली. यंत्र पेटंट नोंदणीसाठी दिले. देशात अशा प्रकारचे यंत्र नसल्याचे तेथे आढळून आले.

त्यानुसार दोघांच्या नावे यंत्राची नोंद झाली. हे यंत्र हे २ अश्‍वशक्तीच्या इलेक्‍ट्रिक मीटरवर चालते. एक २०० लिटरचा ड्रम अडवा फममध्ये बसवला आहे. आत एक कायम व एक फिरणारी अशा दोन फम आहेत. त्यामध्ये नाचणीची कणसे कुस्करून दाणे वेगळे होतात. त्यांना परत सडण्याची गरज नसते. हे यंत्र कोकणातल्या डोंगराळ भागात कोठेही नेणे शक्‍य आहे. यंत्राचे एका तासाला ३०० रुपये भाडे आहे. साधारणतः एका तासात ४ मण नाचणीची मळणी होते. शुक्रवारी कौंढर काळसूर येथील कार्यक्रमात पेटंटची सर्व कागदपत्रे दिली. पेटंट नोंदणीचे काम सह्याद्रीने स्वखर्चाने केले.

यंत्राच्या पेटंटसाठी सह्याद्री निसर्ग मित्रचे सहकार्य मिळाले. नाचणी झोडण्यासाठी यंत्राद्वारे शेतकऱ्यांना सेवा देण्याचे नियोजन आहे. यंत्रात अजून काही बदल करीत ते अधिक सोपे व उपयोगी करण्याचा आमचा मानस आहे. 
- विकास जोशी व सचिन गुजर,
कौंढर काळसूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com