इच्छापूर्ती नागमणीच्या नावाखाली फसवणूक करणारे गजाआड 

Nagmani Fraud Two Arrested in Mahad
Nagmani Fraud Two Arrested in Mahad

महाड : आपल्याकडे इच्छापूर्ती नागमणी असल्याची बतावणी करुन उच्चभ्रू व अंधश्रध्दाळू लोकांना लाखों रुपयाला हा नागमणी विकून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. पोलिसांनी महाड तालुक्यात केलेल्या या कारवाईत दोघांना अटक केली असून, दोघे फरार आहेत.

सुशांत नामदेव मोरे (वय 33,रा.आंबेत-बौध्दवाडी, ता.म्हसळा) व मरकाम कालीदार राजपूत (वय 35 रा.मध्यप्रदेश) अशी पकडलेल्या आरोपीची नावे आहेत. जिल्ह्यात इच्छापूर्ती 'नागमणी’ नावाची काल्पनिक वस्तू मोठया किमतीस विकून अनेकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या कानावर आला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक जे.ए.शेख यांना 5 नोव्हेंबरला रात्री दोन व्यक्ती मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील टोळ फाटा येथे इच्छापूर्ती नागमणी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जे.ए.शेख व सचिन सस्ते यांचे पथक ग्राहक बनून टोळ फाटा येथे पोहोचले. तेथे त्यांना सुशांत व मरकाम हे दोघे भेटले त्यांनी आपल्याकडे इच्छापूर्ती नागमणी असल्याचे सांगितले.

व्यवहाराच्या औपचारिक बोलणी झाल्यानंतर या दोघांनी मण्याचे महात्म्य स्पष्ट करण्याकरीता त्याचे प्रात्यक्षिके दाखविण्याकरीता पोलिसांना सापे गावच्या जवळील रेती बंदरावर नेले. तेथे संजय उर्फ कोरचा राजपूत व वीर हे आणखी दोघे हजर होते. या सर्वांना एलईडीच्या सहाय्याने नागमणी’ दाखवला परंतु पोलिस पथकाचा संशय आल्याने त्यांनी तेथून पळ काढला.

पोलिसांनी सुशांत व मरकामला ताब्यात घेतले. मात्र, अन्य दोघे अंधाराचा फायदा घेत पळून गेले. सदरचा नागमणी प्लॅस्टिकचा असल्याचे सांगून विकत घेण्याकरीता आलेल्या लोकांना एलईडी लाईटच्या सहाय्याने प्रकाश किरणे पाडून त्यांना प्रभावित करत असल्याचे या ठगांनी सांगितले. याप्रकरणी महाड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी कोल्हापूर, तुळजापूर या भागांतही अशा घटना घडलेल्या आहेत.

गुप्तधन ,जादुटोणा अशा प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडता नागरिकांनी सद्सदविवेक बुद्धीने वागावे. तसेच अशाप्रकारे कोणाला फसवले गेले, असल्यास व असे कृत्य करणारी व्यक्ती व टोळी यांच्याबाबतची माहिती तात्काळ पोलिस ठाण्यांना द्यावी.

- अनिल पारस्कर (जिल्हा पोलिस अधीक्षक)

नागमणी असा काही प्रकार नसतो. तो केवळ कथेत असतो. परंतु अनेकदा बेन्झाईन धातूचे खडे नागमणी म्हणून विकले जातात व फसवणूक केली जाते.

- योगेश गुरव, (सर्पमित्र,महाड)

नागमणीचे प्रकार झारखंड, मध्यप्रदेश या राज्यात अधिक प्रमाणात आढळतात. रानटी औषधे विक्री करणारे अखेर परराज्यातील नागरिक रस्त्याकडेला झोपडीत आपला डेरा या टाकतात व तेथून असे व्यवसाय सुरु होतात. यापूर्वी खवलेमांजर, मांडूळ, शार्कची उलटी, कासवे अशा प्राण्यांचा वापर अनेकदा अंधश्रद्धेपोटी केला जातो. नागमणीने सर्व चिंता दूर होतात. संपत्ती व गुप्तधन मिळते, अशा प्रकारचा अपप्रचार केला जातो. त्यातून अशा घटना घडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com