नामदेव गवळी यांना मसापचा पुरस्कार प्रदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 मार्च 2019

कणकवली - सिंधुदुर्गातील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. नामदेव गवळी यांना त्यांच्या ‘भातालय’ काव्यसंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेतर्फे सुहासिनी इर्लेकर काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. गवळी यांना ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या हस्ते गौरविले.

कणकवली - सिंधुदुर्गातील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. नामदेव गवळी यांना त्यांच्या ‘भातालय’ काव्यसंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेतर्फे सुहासिनी इर्लेकर काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. गवळी यांना ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या हस्ते गौरविले.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेतर्फे दरवर्षी कवीच्या पहिल्याच काव्यसंग्रहासाठी सुहासिनी इर्लेकर काव्यपुरस्कार देण्यात येतो.  यात यंदाचा पुरस्कारासाठी प्रा. गवळी यांच्या ‘भातालय’ काव्यसंग्रहासाठी निवड करण्यात आली. या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, ज्येष्ठ नाटककार मकरंद साठे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रा. गवळी म्हणाले, लोकवाङ्‌मयगृहसारख्या मोठ्या प्रकाशन संस्थेकडून माझा मालवणी बोलीतील भातालय काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला हा माझ्या काव्य लेखनाचाच गौरव मी समजतो. यासाठी प्रा. प्रवीण बांदेकर, समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, कवी अजय कांडर, प्रा. गोविंद काजरेकर यांचे सहकार्य लाभले. मी जसा जगतो, तशीच कविता लिहितो. आज पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुरस्काराने गौरविण्यात आल्याने माझ्या मालवणी बोलीतील कवितेकडे गंभीर वाचकाचे लक्ष वेधले जाईल.

प्रा. गवळी यांची कविता तळकोकणातील लोकसंस्कृती, परंपरा आणि डोळस श्रद्धेतील दृढनिश्‍चयतः याच्या केंद्रस्थानी उभी आहे. हा पुरस्कार एकूणच मालवणी बोली साहित्य लेखनालाच प्रेरणा मिळणार असल्याचे प्रतिपादन विविध मान्यवरांनी व्यक्‍त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Namdev Gawli received Masap award