अच्छे दिनाच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला – सुनिल तटकरे

sunil-tatkare
sunil-tatkare

पाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने जनता होरपळली आहे. अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे यांनी केली. पालीतील भक्तनिवास क्रमांक १ मध्ये रविवारी (ता.) आयोजीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षप्रवेश व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

मोदी व भाजप नेत्यांवर तटकरे यांनी टिका केली. २०१४ लोकसभा निवडणुक दरम्यान सर्वसामान्य जनतेच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी दिलेलेले आश्वासन चुनावी जुमला था असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका दुरदर्शन वाहिणीवर जाहीर सांगितले होते की ये अच्छे दिन हमारे गले की हड्डी बन गई है । ना अंदर जाती है ना बाहर आती है, आम्हाला वाटले नव्हते की आम्ही सत्तेवर येवू त्यामुळे आम्ही आश्वासनांची खैरात केली होती. मात्र ही आश्वासने पुर्ण करणे शक्य नसल्याचे गडकरी म्हणाले होते. काही दिवसांपुर्वी पेट्रोल पाच रुपयांनी कमी झाले म्हणून ठिकठिकाणी अभिनंदनाची पोस्टरबाजी झाली. मात्र तेव्हापासून दर दिवशी पेट्रोलवाढ होतच आहे. महागाईने जनता होरपळून निघाली आहे. सिलेंडरच्या वाढत्या भावाने जनता बेजार झाली आहे. करोडो तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन पुर्णतः फेल ठरले आहे. शिवसेना एका बाजूला सत्तेत आहे तर दुसरीकडे सरकारच्या विरोधात देखील जाते. शिवसेनेची भुमिका दुट्टप्पीपणाची आहे. असे तटकरे म्हणाले.

सुधागडसह जिल्ह्यात वसंत ओसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली. सुधागड पेण रोहा मतदारसंघात गिता पालरेच्या यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीसाठी सर्वांनी एकजुटीने व जोमाने कामाला लागा असे आवाहन तटकरे यांनी केले.

यावेळी अनिकेत तटकरे म्हणाले की 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सुनिल तटकरे यांचा पराभव झाला तो केवळ मोदींच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून जो प्रसार प्रचार झाला तिकडे नवीन मतदार वळला म्हणून. मात्र आता आम्ही खबरदारी घेणार आहोत. तरुणांनी मतदार नोंदणी करावी. प्रत्येक बुथवर राष्ट्रवादीचे किमान 10 कार्यकर्ते तयार करावेत. तरुणांचा सहभाग वाढवावा असे अनिकते तटकरे म्हणाले. यावेळी पाली सुधागड पंचायत समिती सभापती साक्षी दिघे, दिपक पवार आदिंसह पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात चौथ्या आशियाई पिन्चॅक सिलॅट (मार्शल आर्टस) चॅम्पीयनशिप स्पर्धेत कास्यपदक विजेता अनुज दत्तगुरु सरनाईक याचा सत्कार करण्यात आला. तसेच आ. सुनिल तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांच्या हस्ते सुधागड तालुक्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास आ.अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी रायगड जिल्हाध्यक्ष वसंतराव ओसवाल, पेण सुधागड रोहा मतदारसंघाच्या अध्यक्षा गिता पालरेचा, पाली सुधागड पं.स. सभापती साक्षी दिघे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस ग.रा.म्हात्रे, रमेश साळुंके, यशवंत पालवे, अनुपम कुलकर्णी, ललित ठोंबरे, सुलतान बेणसेकर, अभिजीत चांदोरकर, वैभव मोहिते, अध्यक्ष महेश खंडागळे, युसुफ पठाण, विजय जाधव, सुशिल शिंदे, किरण खंडागळे, आदिंसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश साळुंके तर आभर प्रदर्शन सुनिल राऊत व सुत्रसंचालन हरिच्छंद्र पाटील यांनी केले.

सुनिल तटकरे यांनी शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांचा समाचार घेतला. २०१४ लोकसभा निवडणुकीत तटकरेंना दोन लाखांच्या मताच्या फरकाने पराभव करण्याच्या वल्गना करणारे अनंत गिते यांना अवघ्या २१ हजार मतांनी विजय स्विकारावा लागला. हा विजय सुध्दा दुसरा सुनिल तटकरे नावाचा उमेदवार उभा केला म्हणून मिळाला. अनंत गिते यांनी गेल्या साडेचार वर्षात जिल्ह्यात नवीन रोजगार निर्मीती करता आली नाही. मतदारसंघाकडे गितेंचे दुर्लक्ष आहे. मुंबई गोवा महामार्ग, पाली खोपोली राज्यमार्ग यांची पुरती दुरावस्था झाली आहे त्याकडे देखिल गिते यांचे लक्ष नाही. असे तटकरे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com