मुख्यमंत्र्यांनी केलेली नाणारसंदर्भातील स्थगितीची घोषणा ही गुगली

राजेंद्र बाईत
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

राजापूर - मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली पण अधिग्रहणाची अधिसूचना रद्द केली नाही. या विषयाच्या घोषणेची गुगली टाकत त्यांनी लोकांना संभ्रमावस्थेत ठेवले आहे. जमीन अधिगृहण स्थगित ठेवण्याऐवजी प्रत्यक्ष अधिसूचना रद्द करा. त्यांच्या घोषणेवर आम्ही समाधानी नाही, अशी प्रतिक्रिया रिफायनरीविरोधी शेतकरी मच्छीमार संघटनेचे सचिव भाई सामंत यांनी दिली. 

नाणार प्रकल्पाच्या जमीन अधीग्रहणाला स्थगिती देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेबाबत प्रकल्पग्रस्तांमध्ये ‘कभी खुशी.... कभी गम’ अशा प्रतिक्रीया आहेत. स्थगिती देण्याच्या घोषणेचा राजकीय स्टंट नको, अधिसूचना रद्द करून त्याची अंमलबजावणी करा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘जैतापूर’सारखी टांगती तलवार ठेवण्यापेक्षा शासनाने ‘नाणार’ कायमचाच रद्द करावा, अशीही मागणी आहे.  

आझाद मैदानावर नाणार प्रकल्पग्रस्तांनी केलेले आंदोलन आणि सभागृहामध्ये आमदारांनी नाणारचा मुद्दा उपस्थित करून शासनाची कोंडी केली. या सार्‍या घडामोडीमध्ये फडणवीस यांनी जमीन अधीग्रहणाला स्थगिती दिली. त्यांच्या या घोषणेनंतर केवळ घोषणा नको, तर प्रत्यक्ष कृती हवी, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. स्थगितीची घोषणा झाली. प्रत्यक्ष अधिसूचना रद्द कधी असा सवाल विचारला जात आहे. नाणारबाबत लोकांच्या असलेल्या अपेक्षा आणि मागण्यांची दखल घेवून शासन लोकांची अपेक्षापूर्ती करणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

नाणार रिफायनरीविरोधात आम्ही केलेल्या आंदोलनाचा खर्‍या अर्थाने विजय झाला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी केवळ घोषणा न करता त्यावर उच्चस्तरीय समितीमध्ये उद्योगमंत्र्यांच्या अहवालावर शिक्कामोर्तब करावे. तोपर्यंत आंदोलन कायम ठेवणार.

- संजय राणे, सागवे

जमीन अधिग्रहणाला स्थगिती दिल्याची घोषणा करून राजकीय स्टंट करण्याऐवजी प्रत्यक्षात अधिसूचना रद्द करावी. रिफायनरीसंबंधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्री चर्चा करणार असतील तर या दोघांनी मिळून नाणार कायमचाच रद्द करावा.

- अशोक वालम, अध्यक्ष, कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समिती

Web Title: Nanar Refinery Project issue