पोटासाठीचे स्थलांतर रिफायनरीने कमी होईल  - समर्थकांचा दावा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प नाणार परिसरात उभा राहिल्यास रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे जिल्हे सुजलाम सुफलाम होतील. सध्या दोन्ही जिल्ह्यांत नोकरी धंदा, उद्योगासाठी आशेचे किरण नाही. कामे कमी होत असल्याने या उद्योजकांपेकी अनेकजण स्थलांतर करत अन्य जिल्ह्यात उपजीविकेसाठी जात आहेत त्यामुळे हा प्रकल्प व्हावा, असे प्रतिपादन कोकण विकास समितीचे टी. जी. उर्फ बाळासाहेब शेट्ये यांनी केले. 

रत्नागिरी - देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प नाणार परिसरात उभा राहिल्यास रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे जिल्हे सुजलाम सुफलाम होतील. सध्या दोन्ही जिल्ह्यांत नोकरी धंदा, उद्योगासाठी आशेचे किरण नाही. उद्योजक, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यापारी व त्यावर आधारित कामे करणारे सवर्च हवालदिल झाले आहेत. कामे कमी होत असल्याने या उद्योजकांपेकी अनेकजण स्थलांतर करत अन्य जिल्ह्यात उपजीविकेसाठी जात आहेत त्यामुळे हा प्रकल्प व्हावा, असे प्रतिपादन कोकण विकास समितीचे टी. जी. उर्फ बाळासाहेब शेट्ये यांनी केले. 

येत्या शनिवारी (ता. 20) सकाळी प्रकल्पासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात समितीतर्फे मोर्चाचा प्रचार केला जात आहे. तसेच यात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. तांत्रिकदृष्ट्या हा प्रकल्प किती प्रगत आणि पर्यावरणपूरक आहे पटवून दिले जात आहे. पेट्रोलियम शुद्धीकरण प्रकल्प हा पर्यावरणाला हानिकारक नाही. देशात अशा 24 रिफायनरी आहेत. चेंबूरमध्ये 60 वर्षापासून दोन रिफायनरी असून नुकतीच त्याची क्षमता वाढवली झाले,असे ते म्हणाले. 

मारुती मंदिर सर्कलपासून 11 वाजता मोर्चा सुरू होईल. कोकणच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पाची उभारणी व्हावी, असे वाटणाऱ्यांनी मोर्चात सहभागी व्हावे,असे आवाहन समितीने केले आहे. रिफायनरीला पूरक मनष्यबळ स्थानिकांमधून तयार करण्यासाठी, पूरक उद्योग थाटण्यात स्थानिकांना प्राधान्य मिळण्यासाठी जिल्हावासीयांनीच प्रयत्न केले पाहिजेत.विविध सामाजिक संस्था, विविध ज्ञातीसंस्था यांच्या भेटी घेत असून त्याना प्रकल्पाबद्दलचे गैरसमज, वस्तुस्थिती याबाबत माहिती देत आहेत. हा प्रकल्प पर्यावरण, फलोत्पादन आणि मच्छी व्यवसायाला हानिकारक नाही याबद्दल समितीतर्फे देण्यात येत आहे. 

हेक्‍टरी 1 कोटीची मागणी 
रिफायनरी प्रकल्प क्षेत्रात साडेसात हजार हेक्‍टर जमीनमालकांची संमती मिळाली आहे.प्रकल्पाला 15 नव्हे 10 हजार हेक्‍टर अपेक्षित जागा आहे. हेक्‍टरी 50 लाख ते 1 कोटी दराची मागणी केली आहे. तीन लाख कोटी रुपये एवढी प्रचंड गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामध्ये उभारणी सुरू झाल्यापासून उत्पादन सुरु होईपर्यंत सुमारे दीड लाख लोकांना रोजगार देण्याची क्षमता आहे, असे कोकण विकास समितीने सांगितले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanar refinery project issue