मुख्यमंत्र्याना स्वस्थ बसू देणार नाही : खासदार राऊत

For Nanar refinery Project Shivsena MP Vinayak Raut
For Nanar refinery Project Shivsena MP Vinayak Raut

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेना आता अधिक आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे नाणार रिफायनरीचा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कारण याच मुद्द्यावरून शिवसेना 'वर्षा'वर धडक देणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.

नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात केंद्र सरकारने सौदी अरेबीयाशी केलेल्या करारामुळे शिवसेना सध्या चांगलीच खवळली आहे. त्यामुळे शिवसेनेची हि नाराजी आत थेट वर्षापर्यत धडकणार आहे. राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाला येेथील स्थानिक जनतेचा पहिल्यापासून तीव्र विरोध आहे. मात्र, हा विरोेध डावलून सध्या हा प्रकल्प रेटण्याच्या तयारीत सरकार आहे. शिवसेना देखील सुरवातीपासून या प्रकल्पाच्या विरोधात आहे. सौदी अरेबियाशी झालेल्या करारानंतर तर शिवसेना अधिकच आक्रमक झाली आहे. वर्षावर मुख्यमंत्र्यांना स्वस्थ बसू देणार असे म्हणत हा प्रकल्प रद्द करण्यासाठी  शिवसेना आमदारांना घेऊन आपण वर्षा बंगल्यावर धडक देणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

सौदी अरेबीयाच्या राजपुत्रांचे लांगुलचालन करण्यासाठी हा प्रकल्पाचा घाट घातला गेल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन अगदी दिल्लीपर्यंत संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या निवासस्थानापर्यँत धडक देऊ असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे..

तसेच आमदार राजन साळवी यांच्यावर दाखल केलेले गुन्हे म्हणजे सरकारची दडपशाही असून हा प्रकल्प लादण्यासाठी मुख्यमंत्री किती उत्सुक झालेले आहेत, हे यावरून दिसत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. तसेच प्रशासनाच्या मदतीनेच येथील जमीन खरेदीविक्रीचे व्यवहार चालत आहेत आणि गुजरातहून जमीन खरेदीसाठी भूमाफियांची टोळधाड आलेली आहे, ती शासनाच्या आशीर्वादामुळेच आली असल्याचा आरोपही खासदार राऊत यांनी केला आहे. त्यामुळे प्रकल्पाविरोधातील वातावरण आता आणखी तापण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com