सिंधुदुर्ग : मायलेकी पाठोपाठ `येथे` वडीलही कोरोना पाॅझिटीव्ह

In Naravade Father Also Corona Positive Sindhdurg Marathi News
In Naravade Father Also Corona Positive Sindhdurg Marathi News

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - निरवडेमध्ये मायलेकी पाठोपाठ वडिलांचाही अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनाने क्वारंटाईन असलेला तिनशे मिटरचा परिसर कंटेन्टमेंट झोन जाहीर केला आहे. इमारतही तात्काळ सील केली आहे. त्यामुळे या परिसरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. 

निरवडेतील आणखी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अगोदर पॉझिटिव्ह आलेल्या महिलेचा तो नवरा असुन तिघांचेही स्वॅब टेस्ट एकाचवेळी घेण्यात आले होते. मुंबई कांदिवलीतून चौघांचे हे कुटुंब निरवडेत आले होते. मुंबईतुन आल्यानंतर त्यांना ज्याठिकाणी क्वारंटाईन केले होते. ती इमारत व त्या परिसरातील भाग कंटेन्टमेंट झोन जाहीर करत आजपासुन त्या परिसरातील रहदारी पूर्णतः बंद केली आहे.

पत्नी व मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या नवऱ्याला व मुलाला सावंतवाडीत संस्थात्मक क्वारटांईन केले होते. आज अहवाल आल्यानंतर वडिलांसह मुलालाही ओरोस येथे हलविण्यात आले. तर मुलाचा अहवाल अद्यापही आला नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी सांगितले. 

तालुक्‍यात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील आलेल्यांचे स्वॅब तपासण्यात आले असुन यातील बहुतांशी लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. काही अहवाल येणे बाकी असल्याचेही डॉ. शिरोडकर यांनी सांगितले. चौकुळ येथील पॉझिटिव्ह रुग्ण ज्याठिकाणी क्वारंटाईन होता तेथील ड्यूटीवरील दोघा शिक्षकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याचे डॉ. शिरोडकर यांनी सांगितले. 

अकरा पॉझिटिव्ह रुग्ण 
तालुक्‍यात अकरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत सुमारे तीन हजार चाकरमानी तालुक्‍यात आले आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com