शिवसेनेवर विश्‍वास ठेवू नये - नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

देवगड - शिवसेना सर्वसामान्यांचे हित जोपासणारा नाही तर सरड्यासाखा रंग बदलणारा पक्ष आहे. त्यामुळे जनतेने त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी किंजवडे (ता. देवगड) येथे केले. राममंदिर उभारणे म्हणजे दुसरे घर बांधण्याएवढे सोपे नसल्याची टीका करताना शिवसेनेचा सुरूवातीला मराठा आरक्षणालाही विरोध होता असेही त्यांनी सांगितले.

स्वाभिमान पक्षाच्या विश्‍वास यात्रेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, सतीश सावंत, संदीप कुडतरकर, अशोक सावंत, विकास कुडाळकर, जयेंद्र रावराणे, अमोल तेली, किरण टेंबुलकर, सावी लोके उपस्थित होते. 

राणे म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाला शिवसेनेचा सुरूवातीपासून विरोध होता; प्रस्ताव गेल्यावर आता आरक्षण मिळणार हे लक्षात येताच शिवसेना जागी झाली. रिफायनरीच्या मंजुरीपासूनच्या सर्व प्रक्रियेत शिवसेना होती; मात्र आता प्रकल्पाला विरोध सुरू आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्‍कासाठी शिवसेना असल्याचे सांगितले जाते; मात्र मुंबईत मराठी माणसाची टक्‍केवारी घटत आहे. तरूणांच्या हाताला काम नाही, अनेकांचा पोटापाण्याचा प्रश्‍न आहे. सेनेकडून सामान्य माणसांची फसवणूक सुरू आहे. पालकमंत्री जिल्ह्यात निधी आणल्याचे सांगतात. मग निधी जातो कुठे? आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था असून, यंत्रणा बंद आहेत, वैद्यकीय अधिकारी नाहीत अशी अवस्था आहे. सूत्रसंचालन बापू धुरी यांनी केले. प्रास्ताविक संदीप साटम यांनी केले. आभार किरण टेंबुलकर यांनी मानले.

Web Title: Narayan Rane Comment