निवडणुकीसाठी स्त्रीशक्तीने पेटून उठावे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 मार्च 2019

कुडाळ - सिंधुदुर्गातील स्त्रीशक्ती पेटून उठली तर आगामी निवडणुकांत आमच्यासमोर कोणीही टिकणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांना विजयी करण्यासाठी कटिबद्ध व्हा, असे आवाहन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक तथा खासदार नारायण राणे यांनी येथे केले.

कुडाळ - सिंधुदुर्गातील स्त्रीशक्ती पेटून उठली तर आगामी निवडणुकांत आमच्यासमोर कोणीही टिकणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांना विजयी करण्यासाठी कटिबद्ध व्हा, असे आवाहन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक तथा खासदार नारायण राणे यांनी येथे केले. महिला मेळाव्यात ते बोलत होते. 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिनानिमित्त येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटरमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी नीलम राणे, स्वाभिमान जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, अशोक सावंत,  जेरॉल फर्नाडिस, भाग्यलक्ष्मी साटम, नगराध्यक्ष ओंकार तेली,  विनायक राणे, संध्या तेरसे, प्रणिता पाताडे, दिपलक्ष्मी पडते, रेश्‍मा सावंत, साक्षी सावंत, अश्‍विनी गावडे, संदीप कुडतरकर, सायली मांजरेकर, अनिशा दळवी, सुजाता हळदीवे, सरोज परब, दिनेश साळगावकर, राकेश कांदे, रुपेश बिडये, प्रथमेश दळवी, चंदन कांबळी यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

श्री. राणे म्हणाले, की गेली २९ वर्षे मी राजकारणात असून या कालावधीत मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, आमदार, खासदार अशी विविध पदे भूषवली. या पदाचा वापर नेहमीच महाराष्ट्र व कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी केला. नीलम राणे यांनी सुद्धा सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दत्ता सामंत, सतीश सावंत, संध्या तेरसे, संजना सावंत, प्रणिता पाताडे यांनीही विचार मांडले. महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांनी सूत्रसंचालन तर भाग्यलक्ष्मी साटम यांनी आभार मानले.

‘त्यांना दरवाजात उभे करू नका’
भविष्यात येणारी आगामी निवडणूक लोकसभा आपल्याला जिंकायची आहे. ही निवडणूक नुसती जिंकायची नाही तर विरोधकांचे डिपॉझिट कसे जप्त होईल, यादृष्टीने तुम्ही काम करा. सिंधुदुर्गात ५२ टक्के महिला वर्ग आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवार मत मागायला येतील. त्यांनी केलेल्या विकासकामांबाबत माहिती घ्या, अन्यथा त्यांना दरवाजात उभे करू नका, असे आवाहनही नारायण राणे यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Rane Comment