केवळ सत्तेसाठी शिवसेनेने केली युती  - राणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मार्च 2019

लांजा - शिवसेना हा थापाड्या पक्ष आहे. शिवसेना कशी आहे हे फक्त मलाच माहिती आहे. मी 39 वर्षे त्या पक्षात काढली. युती होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत उद्धव ठाकरे म्हणत होते, काही झाले तरी युती करणार नाही. युतीमुळे आमचे नुकसान झाले असून आम्ही खड्ड्यात गेलो आहोत. मात्र आता केवळ सत्तेसाठी युती केली. आता पाच वर्षानंतर यांची भाषा बदलली ती निवडणुका आल्यामुळेच, अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केली. 

स्वाभिमान पक्षाचे लोकसभेचे उमेदवार नीलेश राणे यांच्या प्रचाराचा नारळ तालुक्‍यातील पुनस येथे फोडण्यात आला. या वेळी नीलेश राणे, नीलम राणे, औरंगाबादचे स्वाभिमानाचे उमेदवार सुभाष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना खामकर, जिल्हा सरचिटणीस सचिन माजळकर आदी उपस्थित होते. 

पाच वर्षापूर्वी झालेली निवडणूक कशी झाली, ती लोकशाहीची होती का, हा ही प्रश्न आहे. ती एक लाट आली आणि लाटेमध्ये चांगले चांगले वाहून गेले. या लाटेमध्ये ज्यांना तुम्ही निवडून दिलेत ते खासदार विनायक राऊत. ते कोकणात कधी आले, कोकणात कधी काम केले, येथील माणसाला कधी काय दिले? यांचा काहीही कोकणच्या माणसांशी संबंध नाही. कोकणात फक्त त्यांचे गाव आहे. मॅट्रिकला दोन वेळा नापास झालेले खासदार काय कोकणचा विकास करणार, असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Rane Comment