सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, बँक हातात ठेवण्यासाठी राणेंची 'ही' खेळी

Narayan Rane Made Separate Group In Sindhudurg ZP
Narayan Rane Made Separate Group In Sindhudurg ZP

कणकवली -  राज्यात सत्ता स्थापनेला विलंब होत असला तरी सिंधुदुर्गाच्या राजकारणात मात्र मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. भाजपने जिल्हा परिषद आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक आपल्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आपल्या समर्थकांना आज कणकवलीत बोलवून घेतले होते. जिल्हापरिषदेचे 22 सदस्य या बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती पुढे आली आहे. मात्र जिल्हा बँकेचे केवळ तीनच संचालक बैठकीला उपस्थित होते. दरम्यान जिल्हा परिषदेतील राणे समर्थक २४ सदस्यांनी स्वतंत्र गट तयार केला आहे.  

स्वाभिमान भाजप विलीनीकरणानंतर...

विधानसभा निवडणुकीपूर्वी नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने भाजपमध्ये विलीनीकरण झाले. त्यानंतर राणेच्यासोबत असलेले बहुतांशी कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झाले. जिल्हा परिषदेचे सदस्य हे काँग्रेसच्या एबी फॉर्म निवडून आले आहेत. त्यामुळे यात तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. राज्याच्या सत्तेमध्ये वेगळी समीकरणे उदयास आली आहेत परिणामी जिल्ह्यात राणेंची एकहाती सत्ता असलेली ठिकाणे डळमळीत झाली आहेत. जिल्हा परिषदेमध्ये  काँग्रेसमधून निवडून आलेले 26 सदस्य होते. त्यापैकी समर्थक सतीश सावंत यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेकडून आमदार की ही लढवली.

गटनेतेपदासाठी काँग्रेसची बैठक

श्री सावंत हे काँग्रेस पक्षाचे गटनेते होते. आता हे पदच संपुष्टात आले. त्यामुळे गटनेतेपद निर्माण करण्यासाठी आज काँग्रेसच्या सदस्यांना जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांनी निमंत्रित केले होते. सावंतवाडीत बैठक होती तेथे मात्र काँग्रेसचे केवळ तीन सदस्य उपस्थित राहिल्याची माहिती पुढे आली आहे.

रणजित देसाई यांना गटनेतेपद

उर्वरित काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले सदस्य हे राणेच्यासोबत चर्चेला जमले होते. त्यात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि कुडाळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी लढवलेल्या रणजित देसाई यांना गटनेतेपद देण्यात आले. अर्थात ही नेमणूक भाजपच्या बैठकीत झाली आहे. त्यामुळे कायदेशीर हा गट कितपत योग्य ठरणार आहे. हे पुढच्या काळात निश्चित होईल बहुमतासाठी जिल्हा परिषदेत आजही काँग्रेसचे सदस्य पुरेसे आहेत, मात्र जिल्हा काँग्रेस आणि प्रदेश पातळीवरून सदस्यांना कोणती ट्रीटमेंट दिली जाणार आहे यावर बरंच काही अवलंबून राहणार आहे मात्र राणे आपल्या राजकीय खेळीचा उपयोग करून जिल्हा परिषद आपल्या ताब्यात ठेवणार काही पुढच्या काळात निश्चित होणार आहे

व्हीप झुगारून गटाची स्थापना

दरम्यान, हा गट होऊ नये यासाठी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी या सदस्यांना व्हीपही बजावला होता मात्र हा व्हीप झुगारून हा गट स्थापन केला आहे. लवकरच हा गट भाजपमध्ये विलीन होणार आहे.  कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना आधीच अस्तित्वात असलेल्या गटाला असा  व्हीपच काढता येत नसल्याचं राणेंनी म्हटले आहे. कॉग्रेस जिल्हाध्यक्षांनी याबाबत पुन्हा 23 नोव्हेंबरला या सदस्यांची बैठक लावली असून बैठकीला जे हजर राहणार नाहीत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार असल्याचे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com