राणेंचा 'स्वाभिमान' अखेर भाजपमध्ये विलीन; राणे म्हणाले, वाट पाहात होतो

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 October 2019

या दिवसाची वाट पाहत होतो. भारतीय पक्षात कधी आमचा प्रवेश होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, चंद्रकांत पाटील यांचा मी ऋणी आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज प्रवेश मिळाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन केंद्र करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सहकार्य करावे. निसर्गाने कोकणाला खूप काही दिले आहे. येथील विकासासाठी त्यांनी मदत करावी, अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे.

कणकवली : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या पक्षाचे  आज (मंगळवार) भाजपमध्ये विलीन झाला असून, या दिवसाची वाट पाहात होतो असे राणे यांनी सांगितले.

भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज कणकवली येथे प्रचार सभा झाली. या सभेपूर्वी नारायण राणे यांच्या पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेच्या उमेदवाराचे आव्हान आहे. 

नारायण राणे म्हणाले, की या दिवसाची वाट पाहात होतो. भारतीय पक्षात कधी आमचा प्रवेश होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमिमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या पक्षाचे  आज (मंगळवार) भाजपमध्ये विलीन झाला असून, या दिवसाची वाट पाहत होतो असे राणे यांनी सांगितले.त शहा, चंद्रकांत पाटील यांचा मी ऋणी आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज प्रवेश मिळाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन केंद्र करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सहकार्य करावे. निसर्गाने कोकणाला खूप काही दिले आहे. येथील विकासासाठी त्यांनी मदत करावी, अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे. येथील नागरिकांचे हित कायम मी पाहत आलो आणि त्यासाठी प्रामाणिकपणे काम केले. काही मिळविण्यासाठी मी भाजपमध्ये आलो नाही. महाराष्ट्रातील विकास पाहून मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी भाजपमध्ये आलो आहे. कोकणातील रखडलेले प्रकल्प पूर्ण व्हावेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Rane party include BJP in Kankawali f