मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग मांडणार- राणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

चिपळूण- राज्य सरकारने डिजिटल इंडियाच्या हेडखाली एकही संगणक विकत घेतला नाही. अडीच वर्षांत एकही नवीन प्रकल्प उभा राहिला नाही, तरीसुद्धा मुख्यमंत्री राज्यात क्रांती होत असल्याचे खोटे बोलत आहेत. हिवाळी अधिवेशनात त्यांच्या विरोधात मी हक्कभंग प्रस्ताव मांडणार, अशी घोषणा कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी आज येथील जाहीर सभेत केली.
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या पटांगणात ही सभा झाली. राणे यांनी प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. राष्ट्रवादीवर टीका करण्याचे त्यांनी टाळले.

श्री. राणे म्हणाले, ""उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र पूर्वी 113 व्या क्रमांकावर होता. भाजप सरकारच्या काळात तो 140 व्या क्रमांकावर गेला आहे. नवीन उद्योग उभारणीसाठी राज्य सरकारकडे 1 लाख 13 हजार प्रस्ताव दाखल झाले. त्यापैकी एकही प्रस्ताव सरकारने मंजूर केला नाही. एकही गाव डिजिटल इंडिया योजनेअंतर्गत जोडले गेले नाही. तरी मुख्यमंत्री राज्यात क्रांती होत असल्याचे खोटे सांगतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी बाकावर असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रकरणी कॉंग्रेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत होते. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात साडेतीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता फडणवीसांवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान देशाची आर्थिक व्यवस्था दुबळी करण्याचे काम करीत आहेत. त्यांनी लोकांना त्रास देणारे निर्णय घेण्याऐवजी देशहिताचे निर्णय घ्यावेत.''
आम्ही पैशाला लक्ष्मी मानतो. देशाचे पंतप्रधान 500 आणि हजारच्या नोटांना कागदाची उपमा देतात. या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा करून देशातील जनता वाऱ्यावर सोडून ते जपानला गेले. 2 हजार रुपयात लग्न होईल का, नोटा बंदीनंतर काय परिस्थिती निर्माण होईल याचा अभ्यास त्यांनी का केला नाही असा सवाल त्यांनी केला.

आमदार, खासदारांवर टीका
आमदार सदानंद चव्हाण व खासदार विनायक राऊत यांना विधिमंडळात स्थानिक प्रश्‍न मांडताना मी कधीच पाहिले नाही. लोकसभेचे अधिवेशन सुरू असताना राऊत आपल्या घरी आहेत. त्यांना निवडून देऊन मतदारांनी फार मोठी चूक केली, असे राणे यांनी सांगितले.
 
Web Title: Narayan Rane slams CM Devendra Fadnavis again