‘नमो’ प्रेमी उमेदवारच होईल कोकणात खासदार

‘नमो’ प्रेमी उमेदवारच होईल कोकणात खासदार

चिपळूण - नरेंद्र मोदी यांच्यावर मनापासून प्रेम करणारा व त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची इच्छा असलेला नमो प्रेमी उमेदवार रायगड- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी होईल, असा विश्‍वास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. शिवसेना व नारायण राणे एनडीएबरोबर राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

चिपळुणातील भाजपचे कार्यालय व विविध विकासकामांच्या उद्‌घाटनासाठी चव्हाण आज चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी ते म्हणाले, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे. भाजपने मागील पाच वर्षात विकासाची कामे केली. मोदी सरकारने राबविलेल्या योजनांचा देशातील ३८ कोटी जनतेचे लाभ घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.

महाराष्ट्रातील ४५ मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याची इच्छा असलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे पक्षसंघटना खंबीरपणे उभी राहील, असेही त्यांनी सष्ट केले. शिवसेना व नारायण राणेंबद्दल विचारल्यानंतर ते म्हणाले, दोघेही एनडीएचे घटक पक्ष आहेत. लोकसभेत ते आमच्याबरोबर राहतील. यावेळी ॲड. दीपक पटवर्धन, जिल्हा उपाध्यक्ष तुषार खेतल, नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com