दापोली तालुक्यातील नारगोली धरण गाळमुक्त

दापोली तालुक्यातील नारगोली धरण गाळमुक्त

दाभोळ - दापोली तालुक्‍यातील दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली धरणातील गाळ काढून धरणाला नवीन चेहरा देण्याच्या कामाचा नुकताच समारोप करण्यात आला. नारगोली धरण आता गाळमुक्त झाले आहे. यावेळी बोलताना पुढील किमान 25 वर्षे दापोली शहराला पाण्याची समस्या भेडसावणार नाही, असे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी स्पष्ट केले. तसेच या पाणीसाठ्यामुळे परिसरात असणाऱ्या गावांमधील शेती नव्याने बहर घेईल, असे सांगून येथील कृषी उत्पन्नाला दापोली नगरपंचायतीच्या हद्दीत हक्काची विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्याची ग्वाही रोडगे यांनी दिली. यावेळी धरण क्षेत्रात अनेकांच्या हस्ते वृक्षारोपण केले. 

मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या संकल्पनेतून धरणाच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू असून धरणातील गाळ काढण्यासाठी शासनाचा वेगळा निधी नसल्याने आजतागायत गाळ काढण्यात आला नव्हता. रोडगे यांनी धरणाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या निधीशिवाय लोकवर्गणी व श्रमदानातून नारगोली धरणाचे काम सुरू झाले.

लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या समन्वयाने नारगोली धरणातील गाळ काढण्याच्या लोकचळवळीला गती मिळाली. सुमारे 900 लोकांनी या श्रमदानात सहभाग नोंदविला. समारोपाच्या कार्यक्रमाला माजी नौदलप्रमख विष्णू भागवत, दापोलीचे उपविभागीय अधिकारी नितीन राऊत, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, पोलिस निरीक्षक अनिल लाड, मुख्याधिकारी महादेव रोडगे, सामाजिक कार्यकर्ते उत्तमकुमार जैन यांच्यासह नगरसेवक, नगरपंचायतीचे कर्मचारी तसेच दापोलीतील नागरिक व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. 

स्वत:ची वाहने आणून गाळ उचलला 
या कामासाठी लोकसहभागातून जेसीबी, पोकलेन, डंपर वापरण्यात आली. तसेच शेतकऱ्यांनी स्वत:ची वाहने आणून गाळ उचलला. उपलब्ध यंत्रांमुळे आर्थिक स्वरूपात लोकसहभागातून सुमारे 53 लाख 52 हजार 500 रुपयांचे काम झाले. तसेच आजपर्यंत 90 व्यक्तींनी यंत्र, इंधन व आर्थिक स्वरूपात लोकसहभाग दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com