सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्यमार्ग रस्ते तीनपदरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे जाणारे राज्यमार्ग दर्जाचे रस्ते आता तीनपदरी होणार आहेत. "एन्यूटी स्कीम'च्या माध्यमातून यासाठी आवश्‍यक असलेली सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया होणार आहे. यासाठी आवश्‍यक असलेले एक हजार 46 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे युद्धपातळीवर हे काम सुरू होणार आहे.

बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांनी याला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे रस्ते "बीओटी" तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहेत; परंतु टोल न आकारता संबंधित रक्कम सरकारकडून ठेकेदाराला देण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात याचा फायदा जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला होणार आहे. राज्यभर पर्यटनस्थळांचा विकास करण्याचे काम सुरू आहे. यासाठी त्या स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांचा विकास हे महत्त्वाचे पाऊल आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर राज्यसरकारने राज्यातील दहा हजार रस्त्यांचा विकास करण्याचा निर्णय घेतला. यासाठी "एन्यूटी स्कीम' राबविण्यात येत आहे.

Web Title: national higway road development in sindhudurg district