रत्नागिरी : प्रलंबित, वादपूर्व ६८०७ प्रकरणे निकाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Court

रत्नागिरी : प्रलंबित, वादपूर्व ६८०७ प्रकरणे निकाली

रत्नागिरी: लोकअदालतीत जिल्ह्यातून २ हजार ८९० प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे आणि वादपूर्व १४ हजार २०२ प्रकरणे दाखल झाली. ६ हजार ८०७ प्रकरणात निवाडा होऊन वाद संपुष्टात आले असून ५ कोटी १२ लाख ८४ हजार ९५९ रुपये रकमेची वसुलीही झाली. यातील वाद सांमजस्याने निर्णीत झाल्यामुळे सुसंवाद निर्माण झाला.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई उच्च न्यायालय, यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष एम. क्यु. एस. एम. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. प्रलंबित वादामुळे न्याययंत्रणेवरही ताण येतो आणि त्यामुळे निर्णय प्रक्रियेला विलंब होतो. हे लक्षात घेऊन लोकन्यायालय म्हणजेच लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून वाद निवारण हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ७ मे रोजी रत्नागिरीत राष्ट्रीय लोकअदालत झाली. याचे उद्‌घाटन अध्यक्ष एम. क्यु. एस. एम. शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा न्यायाधीश वर्ग १ एल. डी. बिले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आनंद सामंत उपस्थित होते. न्यायालयात २ हजार ८९० प्रलंबित प्रकरणे होती.

त्यापैकी २७२ प्रकरणात निवाडा झाला. १ कोटी ५५ लाख २५ हजार ६२७ रुपये इतक्या रकमेचे निवारण झाले. वादपूर्व १४ हजार २०२ पैकी ६ हजार ८०७ प्रकरणात निवाडे झाले. वादपूर्वमध्ये बँकांच्या कर्जवसुली प्रकरणात २ कोटी ५६ लाख ५७ हजार ४३ रुपये एवढी कर्ज प्रकरणे वसुली झाली. विद्युत वितरण, ग्रामपंचायत आणि इतर प्रकरणातून ३८ लाख ९० हजार ६८८ रुपयांचे वाद सामोपचाराने मिटले. वाहतूक चलन केसेसमध्ये २२ लाख ११ हजार ६०० रुपये वसूल झाले. एकूण ६ हजार ८०७ प्रकरणात निवाडा होऊन वाद संपुष्टात आले असून ५ कोटी १२ लाख ८४ हजार ९५९ रुपयांची वसुली झाली.

लोकअदालतीचे फायदे

३४ महिलांना वाद न करताच मिळाले हक्क

वकील शुल्कासह येण्या-जाण्याचा खर्चाची बचत

अनेक जणांचे संसार पुन्हा जुळले

निर्णय लादला गेला या भावनेवर मात

लवचिक प्रक्रियेमुळे पक्षकारांचे नियंत्रण

पक्षकारांमधील नातेसंबंधांचे स्नेहात रुपांतर

वादाचा निर्णय जलद, मैत्रीपूर्ण वातावरणात

Web Title: National Lok Adalat Ratnagiri 6807 Pending Cases Settled

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top