राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ५०८ प्रकरणांचा निपटारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Lok Adalat

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ५०८ प्रकरणांचा निपटारा

ओरोस : राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील न्यायालयामधून वादपूर्ण आणि प्रलंबित मिळून ५०८ प्रकरणे निकाली काढण्यात विधीसेवा प्राधिकरणला यश आले. यामधून ३ कोटी ४६ लाख ६५ हजार ६३ रुपये एवढे तडजोड शुल्क जमा करण्यात आले.

प्रलंबित आणि वादपूर्व खटल्यांचा निपटारा लवकर व्हावा, यासाठी वादी आणि प्रतिवादी यांच्यात समझोता घडविणारी लोकअदालत फायदेशीर ठरत आहे. १३ ला जिल्हा व सत्र न्यायालयासह जिल्ह्यातील अन्य तालुका न्यायालयांमधून या राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरण अध्यक्ष एस. व्ही. हांडे याच्या मार्गदर्शनाखाली विविध न्यायालयांमधून एकूण १५ पॅनेल कार्यरत होती.

जिल्हा व सत्र न्यायालयात चार पॅनेलखाली या प्रकरणांचा निवाडा करण्यात आला. यामध्ये जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. जोशी, दिवाणी न्यायाधीश (व स्तर) ए. बी. कुरणे, मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. फडतरे, सहाय्यक धर्मादाय आयुक्त एम. एस. निकम यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा समावेश होता. लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष अॅड. राजेंद्र रावराणे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष अॅड. संग्राम देसाई, अन्य वकील, पक्षकार यांचे सहकार्य लाभले. या सर्वांचे जिल्हा विधीसेवा प्राधिकरण सचिव डी. बी. म्हालटकर यांनीआभार मानले.

या लोकअदालतीत विविध न्यायालयांमधील प्रलंबित असलेल्या मात्र तडजोडीने निकाली होऊ शकतील, अशी ३४९८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी २०८ प्रकरणे निकाली झाली असून, ३ कोटी १५ लाख ३९ हजार २९९ एवढ्या रकमेचे तडजोड शुल्क आकारण्यात आले. तर न्यायालयाकडे दाखल होण्यापूर्वीची वादपूर्व अशी ५९९१ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली होती. यापैकी ३०० प्रकरणे निकाली झाली असून, यामधून ३१ लाख २५ हजार ७६४ रुपये तडजोड शुल्क आकारण्यात आले.

Web Title: National People Cort 508 Cases Disposal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kokancrimelok adalat