राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

अमित गवळे
मंगळवार, 8 मे 2018

पाली - राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेले कर्मचार्यांनी मंगळवारपासून  (ता.८) कामबंद आंदोलन सुरु केले आहेत.

सुप्रीम कोर्टाने समान काम व समान वेतन असा निकाल देऊनही सदर निकालाची कृतीशिल अंमलबजावणी केली जात नाही. शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यीका, लेखापाल,कार्यक्रम सहाय्यक, स्टाफ नर्स यांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घ्यावे या मागणीसह अन्य मागण्यांच्या पुर्ततेकरीता 8 मे पासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. 

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत राज्यात १८ हजार कर्मचारी तर रायगड जिल्ह्यात ६०० कर्मचारी शासनाने कंत्राटी पध्दतीने नियुक्त केले आहेत. या कर्मचार्‍यांकडून अल्प वेतनात काम करुन घेतले जात आहे. सुधागड तालुक्यातील पाली व जांभुळपाडा आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण 14 उपकेंद्र असून येथील रिक्त जागांवर 14 कर्मचारी काम करीत आहेत. मागील अनेक वर्षापासून आरोग्य विभागातील रिक्त पदांवर सध्या कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांचे समायोजन करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांच्या कामबंद आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर याचा विपरीत परिणाम होऊन रुग्णांचे मात्र हाल होणार आहेत.

सदर कामबंद आंदोलनात राज्यातील ३३ जिल्ह्यांनी सहभाग घेतला आहे. १४ मे रोजी नाशिक ते मुंबई मंत्रालयावर लाँगमार्च काढण्यात येणार आहे. या संपात आशा कार्यकर्त्या देखिल सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष विकास धुमाळ यांनी दिली.

Web Title: National Rural Health Mission Worker's Movement