राष्ट्रवादीकडून आदिवासी समाजभवनाचे राजकारण - अनंत गिते

pali
pali

पाली - सुधागड तालुक्यात आदिवासी समाजाचे पालीत हक्काचे समाजभवन उभे राहावे याकरीता आदिवासी समाजाने केलेल्या मागणीनुसार खासदार फंडातून 10 लाखाचा निधी उपलब्द करुन दिला. समाज मंदीरासाठी आर्थीक तरतुद होऊन निविदा निघुन प्रत्यक्षात कामही सुरु झाले आहे. मात्र राष्ट्रवादीकडून आदिवासी समाजभवनाचे राजकारण सुरु आहे. ही बाब दुर्देंवी असल्याचे मत अनंत गिते यांनी व्यक्त केले. पालीत विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी अनंत गिते आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टिका केली.

राजकारण करणार्‍यांनी खुशाल राजकारण करावे आम्ही समाजाशी बांधील आहोत. समाजभवनाच्या रुपाने आदिवासी समाजबांधवांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता झाली आहे. असे अनंत गिते म्हणाले. आदिवासी समाज भवन उभारण्यासाठी शिवसेनेने केलेले भुमीपुजन अधिकृत आहे. तर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने घाईत केलेले भुमिपुजन अनधिकृत असल्याचा दावा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख किशोर जैन यांनी केला होता. त्यानंतर आदिवासी समाज नेत्यांनी एकाएकी पत्रकार परिषद घेवून शिवसेनेचा निधी नाकारला असल्याचे सांगितले. यावर सुधागड तालुका शिवसेना प्रमुख मिलिंद देशमुख म्हणाले की राष्ट्रवादी कॉग्रेसने 15 वर्ष लोकांची दिशाभूल करुन आजवर तालुका विकासापासून वंचीत ठेवला आहे. समाजहितासाठी नव्हे तर स्वताचे क्रेडीट वाढविण्यासाठी पक्षस्थलांतर करणार्‍या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनंत गितें बद्दल बोलू नये अन्यथा त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देवू असे देशमुख म्हणाले.

आदिवासी बांधवांच्या नावावर राजकारण
मागील वर्षभरापासून सुधागड तालुक्यात आदिवासी समाजाच्या नावावर राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेना या दोन पक्षात टोकाचे राजकारण केले जात आहे. आदिवासीं बांधवांचे आपल्याच पक्षाकडे कसे समर्थन आहे हे दाखविण्यासाठी मागील वर्षभरात आदिवासी बांधवांचे पक्षप्रवेश कार्यक्रम व मेळावे घेण्यात आले. तसेच विविध योजना व विकासकामांसाठी शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाकडून भरिव निधी देणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र या घाईगडबडीत व श्रेयवादाच्या लढाईत एकाच कामाचे दोन वेगवेगळ्या पक्षांनी पाठोपाठ भुमिपुजन केल्याचे समोर देखील आले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com