राष्ट्रवादी लढणार 'ही' निवडणूक शिवसेनेच्या विरोधात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

महाविकास आघाडीचे सरकार येण्यापूर्वी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी शहर विकास आघाडीचा उमेदवार निश्‍चित झाला होता. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध ही निवडणूक लढणार. तरीही शिवसेनेचा प्रस्ताव आला तर त्याबाबत विचार करू, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये यांनी स्पष्ट केले.

 

रत्नागिरी : महाविकास आघाडीचे सरकार येण्यापूर्वी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी शहर विकास आघाडीचा उमेदवार निश्‍चित झाला होता. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध ही निवडणूक लढणार. तरीही शिवसेनेचा प्रस्ताव आला तर त्याबाबत विचार करू, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीच्या सरकारच्या शपथविधीला राष्ट्रवादीकडून जयस्तंभ येथे जल्लोष करीत लाडूंचे वाटप केले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, राज्यस्तरावर शिवसेना, राष्ट्रवाद आणि कॉंग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्याचा जल्लोष करण्यासाठी आम्ही एकत्र जमलो आहोत. मात्र, स्थानिक पातळीवरही आघाडी करा, असे कोणतेही संकेत दिलेले नाहीत.

हेही वाचा - डुकरांच्या शिकारीचा व्हिडिओ केला व्हायरल अन्... 

शिवसेनेशी चर्चा करून सर्वानुमते ठरवू 

त्यामुळे नगराध्यक्ष पोटनिवडणुकीला आम्ही शिवसेनेविरुद्ध लढणार हे निश्‍चित आहे. शहर विकास आघाडीचे उमेदवार मिलिंद कीर यांचे नाव निश्‍चित झाले आहे. तेव्हा नाराणय राणे आमच्याबरोबर होते. आता ते भाजपमध्ये गेले आहेत. भाजपचाही तसा पाठिंबा होता. परंतु आता ते स्वतंत्र लढणार, हे निश्‍चित आहे. मात्र त्याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही. शिवसेना आमच्याशी चर्चा करायला आली तर आम्ही त्याचा सर्वानुमते विचार करू. 

तर राष्ट्रवादीची ताकद वाढेल, असे वाटत नाही 

स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही शिवसेनेबरोबर गेलो तर रत्नागिरीत आमच्या पक्षाची ताकद वाढेल, असे वाटत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर अजून कोणताही निर्णय आम्ही घेतलेला नाही, असे कुमार शेट्ये यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा - PHOTOS : प्री-वेडिंग शूटचे हॉट डेस्टिनेशन म्हणून ही ठिकाणे येताहेत नावारूपास 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Fight Against Shivsena In Ratnagiri By Elections