नाणार विरोधी राष्ट्रवादीच्या अजित यशवंतराव यांचे उपोषण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

कोकणाला विकायचा घाट शासनाने घातलाय अशी टीकाही त्यांनी केली आहे. या शासनाच्या विरोधात राष्ट्रवादीचे युवा नेते अजित यशवंतराव आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणााला बसले आहेत.

रत्नागिरी : नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत सरकार फक्त इथल्या जनतेची फसवणूक करत असून राज्य सरकार लपंडाव खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे युवा नेते अजित यशवंतराव यांनी केला.

कोकणाला विकायचा घाट शासनाने घातलाय अशी टीकाही त्यांनी केली आहे. या शासनाच्या विरोधात राष्ट्रवादीचे युवा नेते अजित यशवंतराव आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणााला बसले आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे 10 मे रोजी नाणार येथील प्रकल्पग्रस्तांची भेट घेणार असून शरद पवार यांनी जाहीर केल्यानंतरच उर्वरित राजकीय पक्षाने आपली भूमिका नाणारबाबत मांडली असा दावाही अजित यशवंतराव यांनी केला. खरंतर नाणार प्रकल्पावरून कोकणातलं राजकीय वातावरण चांगलेच तापल आहे. हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत कोकणामध्ये होऊ नये अशी ठाम भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे. 

नाणारमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी झाले होत आहेत. या प्रकल्पाला शंभर टक्के विरोध असणार असून, यासाठी आणखी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा अजित यशवंतराव यांनी दिला आहे.

Web Title: NCP leader Ajit Yashwantrao agitation against Nanar project