झोपडपट्टी आणि चाळीमधील लोकांना स्थलांतरित करा! सरकारला आमदाराचे पत्र

ncp mla shekhar nikam write a letter maharashtra government
ncp mla shekhar nikam write a letter maharashtra government

चिपळूण - संपूर्ण जगभरात कोरोनासारख्या महाभयान रोगाने थैयमान घातले आहे. तो आता आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावीतही येवून पोहोचला आहे. त्याचा प्रसार थांबवा यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी राज्य सरकारला एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रातून आमदार निकम यांनी चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना मुंबईतल्या अन्य ठिकाणी स्थलांतरित करावे अशी मागणी राज्यसरकारकडे केली आहे. 

मुंबईत खूप मोठ्या प्रमाणावर झोपडपट्या पसरल्या आहेत. अतिशय छोट्या खोल्यांमध्ये येथील लोक रहात आहेत. तिथे करोना टाळण्यासाठी उपाय योजणा तकणे सोयीचे नाही. अशा भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. हे टाळायचे असेल तर येथील लोकांना मुंबईतील अन्य ठिकाणी स्थलांतरित करावे असे आमदार निकम यांनी म्हटले आहे. याबरोबरच आमदार निकम यांनी या पत्रात म्हटले आहे की, कोकणातील अलेक लोक लॉकडाऊनमध्ये अडकून पडले आहेत त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना घरी पाठवावं. 

परंतु राज्य शासनाने जिल्ह्या जिल्ह्यामध्ये होणाऱ्या वाहतुकीवर बंदी घातल्यामुळे सध्या या चाकरमान्यांना निदान लॉकडाउन संपेपर्यंत मुंबईमध्येच राहावे लागेल हे स्पष्ट केलं आहे. कोकणातील बरीच लोक मुंबईमध्ये कामानिमित्त येतात. मार्च एप्रिल महिन्यामध्ये बरेच लोक मुंबईला लग्न किंवा इतर कार्यासाठी मंडप घालण्याच्या कामासाठी वास्तव्य करतात. मात्र या कुणालाही बाहेर जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

येथे राहणाऱ्या लोकांच्या घरांमध्ये खेळती हवा आणि ऊन, दोन्ही नसते. काही ठिकाणी बाथरुमही घराबाहेरच असतात. कष्टकऱ्यांच्या या वस्त्यांमध्ये वातावरणामुळे टी.बी.सारख्या रोगाचा प्रादुर्भाव असतो. परिस्थिती लक्षात घेता करोना सारख्या भीषण रोगाला मुंबईतल्या या वस्त्या बळी पडू नये, म्हणूनच आमदार निकम यांनी राज्य शासनाला हे पत्र लिहून आपल्या मागण्या मांडल्या आहेत. 

आमदार निकम यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये सोय नसल्यामुळे तिथे तिथे या सोयी उपलब्ध कराव्यात किंवा या सोयी जिथे आहेत तिथे या सगळ्यांना न्यावे. रिकाम्या शाळा, कॉलेज किंवा क्लब अशा जवळच्या ठिकाणी या लोकांची राहण्याची सोय करावी.  कधीकधी एका छोट्याशा खोलीत दहा-दहा जण राहतात. यांना शिफ्टमध्ये झोपावे लागते आणि त्यामुळे येथे एखादा आजार आला तर तो झपाट्याने पसरण्याचा धोका आहे,” 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com